---Advertisement---

क्रिकेटसाठी काय पण! दुखापत झाली असतानाही पायावर पट्टी बांधून सचिनने खेळली फायनल

On: मंगळवार, मार्च 23, 2021 7:30 AM
---Advertisement---

रविवारी (२१ मार्च) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मधील अंतिम सामना भारतीय लिजेंड्स आणि श्रीलंकन लिजेंड्स यांच्यात पार पडला. या सामन्यात भारतीय लिजेंड्स संघाने १४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय लिजेंड्स संघाने पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मालिकेत भारतीय लिजेंड्स संघाचे नेतृत्वपद सचिन तेंडुलकरकडे होते. अंतिम सामन्यात सचिन कोणत्या परिस्थितीत मैदानात उतरला याचे उत्तर त्याच्याच संघसहकाऱ्याने एक छायाचित्र शेअर करत दिले आहे.

सचिनचे ते छायाचित्र होतेय व्हायरल
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय लिजेंड्सच्या खेळाडूंचे सर्वजण अभिनंदन करत आहेत. निवृत्तीनंतरही सर्व खेळाडूंनी त्याच जोशात कामगिरी करत चषक उंचावला. मात्र, अंतिम सामन्याची तयारी करतानाचे सचिनचे एक छायाचित्र त्याचा संघ सहकारी व भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले.
यामध्ये, सचिन आपल्या पायाला पट्ट्या व प्लास्टर लावून घेताना दिसत आहे. कैफने या छायाचित्राला कॅप्शन देत लिहिले, ‘पट्ट्या आणि प्लास्टर… काय माणूस आहे’

हे छायाचित्र अनेकांनी रिट्विट केले तसेच, त्याला चाहत्यांची पसंती लाभत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या ट्विटखाली कमेंट करत लिहिले, ‘प्लास्टरसोबत मास्टर ब्लास्टर, खूप आदर.’ अन्य एका ट्विटर खात्यावरून लिहिले गेले आहे, ‘देव क्रिकेट नाही सोडू शकत.’

https://www.instagram.com/p/CMrigQOrG2t/?utm_source=ig_web_button_share_sheet

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सचिनची दमदार कामगिरी
सचिनने या स्पर्धेच्या ७ सामन्यात सहभाग नोंदविला. त्याने या ७ सामन्यात २३३ धावा चोपल्या. ज्यामध्ये ३४ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. सचिनने स्पर्धेदरम्यान दोन अर्धशतके देखील ठोकली. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसर्‍या आणि भारतीय लीजेंड्सकडून अव्वलस्थानी राहिला. तसेच, कर्णधार म्हणून प्रथमच कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याला यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG: पुण्याच्या मैदानावर नाणेफेकीचा किती परिणाम? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि वातावरण

प्रतिभा असूनही भारतीय संघासाठी दुसरी संधी न मिळालेले कमनशिबी शिलेदार

चौथ्या क्रमांकावर कोणत्या मुंबईकरांची लागणार वर्णी? प्रश्न अजूनही अनुत्तरित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---