पुणे। मास्को रशिया येथे मास्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताने २० सुवर्ण, २५ रौप्य, २० कांस्य पदके पटकाविली तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कल्याणी जोशी हिने तायजीक्वॉन इव्हेंन्ट मध्ये १ सुवर्ण व ड्युअल मध्ये १ रौप्य आणि स्वराज कोकाटे याने नंनक्वान इन्व्हेन्ट मध्ये कांस्य तर ड्युअलमध्ये रौप्य पदक पटकाविले.
स्वयंम कटके, सलोनी जाधव, मिताली वाणी यांना ड्युअल इव्हेन्ट मध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत एकूण १५ देशाच्या जवळपास ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्राचे सोपान कटके यांनी भारतीय वुशू संघाची मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने पदकांची लयलूट केली. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा माॅस्को येथे पार पडली.
भारतीय संघ दिल्लीत आल्यावर वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंदर सिंह बाजवा सीईओ सोहेल अहमद यांनी सर्व खेळाडू व कोचेसचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद सिराज