Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले”

"विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले"

January 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Ravi Shastri

Photo Courtesy: Twitter/@BCCI


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो यापुढे भारताकडून केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. विराटने कसोटी कर्णधार म्हणून आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. असे असतानाच विराटने कर्णधारपद सोडल्याबद्दल एका अभिनेत्याने आनंद व्यक्त केला आहे.

चित्रपट अभिनेता कमाल आर खान त्याच्या रिव्ह्यूमुळे खुप चर्चेत असतो. तो कोणत्या ना कोणत्या चित्रपटावर आपले विचार आणि मत सांगून वादात पडत असतो. या अभिनेत्याने विराट कोहलीच्या कर्णधार म्हणून राजीनाम्यावरसुद्धा मत मांडले आहे.

कमाल आर खानने आपल्या यूट्युब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने विराट कोहलीवर निशाना साधला आहे. तो म्हणाला की, “विराट कोहली आणि रवी शास्त्रीने महेंद्र सिंग धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले होते. २०१४ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. तेव्हा कसोटी मालिकेचा एक सामना शिल्लक राहिला असताना धोनीवर एवढी जबरदस्ती करण्यात आली की त्याने कर्णधारपद सोडले.”

कमाल आर खानने विरीट कोहलीवर जरा सुद्धा दया दाखवली नाही. त्याने विराटवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तो एवढ्यावरचं थांबला नाही तर त्याने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कमाल आर खान म्हणाला, “विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच नात खुप घट्ट आहे. जे वेगळे करणे खुप कठिण आहे. या काळात त्यांनी भारतीय क्रिकेटवर राज्य केले. विराट कोहली आणि रवी शास्त्री भारतीय संघात ज्याला हवं त्याला खेळवत होते आणि ज्याला हवं त्याला बाहेर काढायचे. या दोघांनी मिळून अनेक खेळाडूंचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.”

पुढे तो म्हणाला की, “विराट कोहलीने फक्त धोनीचाच अपमान केला नाही, तर अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्यावर त्याने अन्याय केला होता. त्यामध्ये फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा सामावेश आहे.”

कमाल आर खानचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ एक लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Photo: धोती-कुर्त्यात खेळाडू अन् संस्कृत भाषेत समालोचन, असा क्रिकेट सामना पाहिलाय का?

कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झालेला सिराज वनडे मालिकेत खेळणार का? उपकर्णधाराचा मोठा खुलासा

काय दिवस आलेत! एकेवेळी पहिल्या नंबर असलेला विराट आता बीसीसीआयच्या व्हिडीओतही तिसऱ्या नंबरवर

व्हिडिओ पाहा – क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा 


Next Post
Rohit's-Father-Batting

रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर 'हिटमॅन'ही फिदा

Abhimanyu Easwaran

आयपीएल न खेळता 'हे' ३ क्रिकेटपटू करू शकतात भारतीय संघात पदार्पण

Photo Courtesy: Twitter/BCCI

कॅप्टन्स इनिंग! विराटने कसोटी कर्णधार असताना केलेल्या 'या' ५ खेळी विसरणे अशक्यच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143