श्रीलंकेचा युवा फलंदाज कमिंदू मेंडिस एकामागे एक नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काल 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने आणखी एक विक्रम रचला आहे. जो कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 3 गडी गमावून 306 धावा केल्या होत्या. दिनेश चंडीमलने 116 धावांची शतकी खेळी केली. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा अँजेलो मॅथ्यूजने 78 आणि कामिंडू मेंडिसने 51 धावा करुन नाबाद आहेत.
कमिंडू मेंडिस आता कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडू बनला आहे. ज्याने कसोटी पदार्पणानंतर पहिल्या आठ सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. पदार्पणापासूनच सलग अर्धशतकं करण्याच्या बाबतीत मेंडिस पुढे गेला आहे. पण कसोटी सामन्यात सलग 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या व्हिव्हियन रिचर्ड्सच्या नावावर आहे. त्याने सलग 11 सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात मेंडिसने 114 धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 51 धावा करुन तो नाबाद आहे. मॅथ्यूज आणि मेंडिस यांच्यात 85 धावांची भागीदारी झाली आहे.
कमिंडू मेंडिस श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. आतापर्यंत त्याने 8 सामन्यांच्या 13 डावात 873 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 79.36 च्या उत्कृष्ट सरासरीने धावा केल्या आहेत. श्रीलंकेसाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज रॉय डायस आहे. ज्याने हा पल्ला ओलांडण्यासाठी 23 डाव घेतले. परंतु मेंडिस 15 डावांमध्ये किंवा त्यापूर्वीही ही कामगिरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा-
कानपूर कसोटीसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? सहाय्यक प्रशिक्षक नायर म्हणाले…
शाकिबला मायदेशात परतण्याची वाटतेय भीती, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे केली सुरक्षेची मागणी
केएल राहुलबाबत काय आहे गंभीर आणि नायरचे नियोजन? सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितले सर्वकाही