आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. या सामन्यात केकेआरचे युवा गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांनी राजस्थानच्या फलंदाजांसमोर टिच्चून गोलंदाजी केली. या वरही त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करत आतापर्यंतच्या ३ सामन्यात ३ बळी मिळवले आहेत. या युवा गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळण्याची ४ कारणे जाणून घेणार आहोत.
कमलेश नागरकोटी याला भारतीय संघामध्ये संधी मिळू शकेल
१. नागरकोटी आहे एक उत्तम गोलंदाज
युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी गेल्या २ वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सदस्य होता. परंतु तो आपल्या फिटनेसच्या कारणामुळे संघाच्या बाहेर होता. पण आता तो या आयपीएल हंगामात पदार्पण करत गोलंदाजीचा पराक्रम दाखवताना दिसत आहे. नागरकोटी आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ सामने खेळला आहे. परंतु नागरकोटीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २ षटके फेकली, ज्यामध्ये त्याने १२ धावा देऊन २ बळी घेतले. या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो एक उत्तम गोलंदाज आहे, यांचा भारतीय संघाला चांगला फायदा होऊ शकतो.
२. नागरकोटी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक
कमलेश नागरकोटी एक अष्टपैलू खेळाडू आहे कारण तो गोलंदाजी-फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही उत्तम आहे. माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने त्याचे वर्णन रवींद्र जडेजाच्या बरोबरीचा क्षेत्ररक्षक म्हणून केले आहे. सीमारेषेजवळ किंवा त्याच्या गोलंदाजीवर तो जबरदस्त झेल घेताना दिसत आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध जोफ्रा आर्चरचाही नागरकोटीने चांगला झेल टिपला. सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अशा खेळाडूंकडे खूप लक्ष देतो, जे सर्व क्षेत्रात संघासाठी चांगले काम करतात.यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने आतापर्यंत २ झेल टिपले आहेत.
३. आता नागरकोटी पूर्णपणे आहे फिट
जर एखादा खेळाडू चांगली गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असेल, तर त्या खेळाडूची फिटनेस पातळी खूपच उंचावलेली असते. नागरकोटी काही काळ फिटनेसशी झगडत होता, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यानंतरच त्याने मैदानावर क्षेत्ररक्षण करताना धावण्याबरोबरच डाइव्ह मारून चेंडू थांबवले आहेत.
४. कमलेश चांगली फटकेबाजी करतो
कमलेश नागरकोटी गोलंदाजी बरोबरच एक चांगला फलंदाज देखील आहे. हा युवा खेळाडू खालच्या क्रमवारीत चांगली फलंदाजी करून धावा करू शकातो. कमलेश नागरकोटीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ८ धावांची खेळी केली. त्याची फलंदाजीची क्षमता पाहता क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितले की कमलेशही चांगली फलंदाजी करू शकतो. कमलेशने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये खेळलेल्या ९ सामन्यात २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.