---Advertisement---

‘पाकिस्तान क्रिकेटच्या दुर्दशेसाठी बाबर आझम अन् इमरान खान जबाबदार’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान

On: गुरूवार, जून 30, 2022 7:56 PM
Babar-Azam-Imran-Khan
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात अनेक माजी खेळाडू प्रशिसकीय कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचा मीज यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल देखील या सत्रात सामील झाला आहे. अकमलने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि इमनरान खान यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

कामरान अकमलच्या मते इमरान खान (Imran khan) यांनी पाकिस्तान क्रिकेटची दुर्दशा केली आहे. त्याला असेही वाटते की डिपार्टमेंटल क्रिकेट संपवून पीसीबीने सर्वात मोठी चूक केली आहे. कामरान अकमल (Kamran Akmal) एका मुलाखतीत बोलताना म्हमलाा की, “पीसीबी आणि इमरान खानने पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही असे प्रयोग केले, ज्याची काहीच गरज नव्हती. त्यांच्या या प्रयोगांमुळेच पाकिस्तान क्रिकेटची दुर्दशा झाली आहे, ज्यामुळे खूप नुकसान झाले आहे. खासकरून गुणवंत क्रिकेटपटूंवर याच्या परिणाम झाला आहे.”

अकमलने सध्याचा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) याच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले. त्याच्या मते पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण बाबर आजमला एक चांगला कर्णधार ठरवणे म्हणजे खूप घाई केल्यासारखे होईल. तो म्हणाला की, “असे म्हणणे खूप घाईचे होईल की, बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ खूप चांगले प्रदर्शन करत आहे. बाबर अजून खूप युवा आहे आणि त्याला कर्णधार बनवून आता फक्त एकच वर्ष झाले आहे. त्याच्यासमोर अजून खूप अडचणी यायच्या बाकी आहेत.”

दरम्यान, कामरान अकमल पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज राहिला आहे. त्याने स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी ५३ कसोटी, १५७ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामन्याचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी २६४८ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३२३६ धावा आहेत. अकमलने खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्ये तो ९८७ धावा करू शकला. पाकिस्तान संघासाठी अकमलने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ साली खेळला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनेच अखेर केली शेन वॉर्नची बरोबरी, वाचा काय आहे अनोखा विक्रम

आता पक्क झालंय! पाचव्या कसोटीसाठी ‘हाच’ असेल कर्णधार, बीसीसीआयने केली घोषणा

मन जिंकलस भावा! विराट कोहलीची आपुलकी कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---