पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने टी२० क्रिकेटमध्ये एक मोठा किर्तीमान केला आहे. तो टी२० क्रिकेटच्या इतिहासात यष्टामागे सर्वाधिक फलंदाजांना यष्टीचीत करणारा जगातील पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे.
पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या राष्ट्रीय टी२० चषक स्पर्धेतील २४वा सामना मंगळवारी (१३ ऑक्टोबर) मध्यवर्ती पंजाब विरुद्ध दक्षिण पंजाब संघात झाला. या सामन्यात अकमलने दक्षिण पंजाब संघाचा कर्णधार शान मसूदला यष्टीचीत करत हा विक्रम आपल्या नावावर केला. मसूदची विकेट ही अकमलची टी२० क्रिकेट कारकिर्दीतील १००वी यष्टीचीत विकेट ठरली.
त्याच्यानंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा फलंदाजांना यष्टीचीत करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत एमएस धोनीचा दूसरा क्रमांक लागतो. धोनीने आतापर्यंत ८४ फलंदाजांना यष्टीचीत करत मैदानाबाहेर पाठवले आहे. तर कुमार संगकारा (६० विकेट्स) आणि दिनेश कार्तिक (५९ विकेट्स) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
याव्यतिरिक्त अकमल आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना यष्टीचीत करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत दूसऱ्या स्थानावर आहे. मात्र या विक्रमातही अव्वल स्थान पटकावण्याची त्याच्याकडे संधी आहे. यासाठी त्याला फक्त २ यष्टीचीत विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९८ सामन्यात सर्वाधिक ३४ फलंदाजांना यष्टीचीत करत धोनी अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे अकमलकडे चांगली संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास
हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर
फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष