पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू आपल्या चित्रविचित्र कारनाम्यांनी नेहमीच चर्चेत असतात. आता पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यानं शिख धर्मावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्याला माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं जोरदार उत्तर दिलं.
वास्तविक, कामरान अकमल यानं लाईव्ह टीव्हीवर शिख धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, जे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग चांगलाच भडकला. कामरानच्या वक्तव्यावरून भज्जीनं त्याचा क्लास घेतला. कामरान अकमलनं भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबाबत हे वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 20वं षटक फेकलं होतं.
लाईव्ह टीव्हीवर बसून कामरान अकमल शिख धर्माबाबत जे बोलला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकमलचा व्हिडिओ शेअर करत हरभजन सिंग म्हणाला, “आपलं तोड उघडण्यापूर्वी तुला शिख धर्माचा इतिहास काय आहे हे माहित असायला हवं. आम्ही शिखांनी तुमच्या आया-बहिणींना आक्रमकांपासून वाचवलं. तुला लाज वाटली पाहिजे.”
Lakh di laanat tere Kamraan Akhmal.. You should know the history of sikhs before u open ur filthy mouth. We Sikhs saved ur mothers and sisters when they were abducted by invaders, the time invariably was 12 o’clock . Shame on you guys.. Have some Gratitude @KamiAkmal23 😡😡🤬 https://t.co/5gim7hOb6f
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 10, 2024
हरभजन सिंगच्या उत्तरानंतर कामरान अकमलनं शिख समुदायाची माफी मागितली. अकमलनं ‘X’ वर लिहिलं, “मी माझ्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतो आणि हरभजन सिंग व संपूर्ण शिख समुदायाची माफी मागतो. माझे शब्द चुकीचे आणि अपमानजनक होते. मी जगभरातील शिखांचा अत्यंत सन्मान करतो. माझा कोणाच्याही भावनांना ठेच पोहचवण्याचा हेतू नव्हता.”
9 जून रोजी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अर्शदीप सिंगनं सामन्याचा 20 वा ओव्हर फेकला होता. या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. मात्र पाकिस्तानचा संघ केवळ 13 धावाच करू शकला. अर्शदीपनं शेवटच्या षटकात अचूक यॉर्कर्स टाकले, ज्याचं पाकिस्तान फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. त्यानं शेवटच्या षटकात एक विकेटही घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतर पाकिस्तानमध्ये फुटणाऱ्या टीव्हींवरून दिल्ली पोलिसांनी उडवली खिल्ली, ट्वीट व्हायरल
विजयानंतरही भारतीय संघात हे 3 बदल आवश्यक, रोहित शर्माच्या हातून या चुका पुन्हा घडायला नको
बलात्काराच्या आरोपानंतर विश्वचषकात पुनरागमनं, वेस्ट इंडिजमध्ये खेळणार ‘हा’ स्टार क्रिकेटपटू