आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला उमरान मलिक याने त्याच्या गतीने सर्वांना प्रभावित केले आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला महत्त्वपूर्ण विकेट्सही मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे मलिक हैदराबाद संघाचा हुकुमी एक्का बनला आहे. असे असले तरीही, अद्याप त्याला भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने विवादास्पद वक्तव्य केले आहे.
मलिकची (Umran Malik) इकोनॉमी जास्त असली तरीही तो स्ट्राईक गोलंदाज असून सातत्याने विकेट्स चटकावतो. तो पाकिस्तानात असता तर आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असते, असा खोचक टोला कामरानने (Kamran Akmal) लगावला आहे.
पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलशी बोलताना कामरान (Kamran Akmal Statement About Umran Malik) म्हणाला की, “जर तो पाकिस्तानात असता, तर निश्चितपणे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता. त्याची इकोनॉमी खूप जास्त आहे, परंतु तो स्ट्राईक गोलंदाज आहे आणि त्याला सातत्याने विकेट्स मिळत असतात. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या गतीचे चार्ट येत असतो. तो सातत्याने १५५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करत असतो. त्याच्या गतीत दिवसेंदिवस वाढत होत आहे.”
“याघडीला भारतीय संघांमध्ये (Team India) जागा मिळवण्यासाठी भरपूर स्पर्धा आहे. भारतीय संघाकडे आधी चांगले वेगवान गोलंदाज नसायचे. परंतु आता नवदीप सैनी, मोहमम्द सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांचा त्यांच्याकडे भरणा आहे. उमेश यादवही चांगली गोलंदाजी करत आहे. अशाप्रकारे संघात १०-१२ चांगले गोलंदाज असल्याने भारतीय निवडकर्त्यांसाठी संघ निवडणे त्रासदायक ठरते,” असे कामरानने म्हटले.
शेवटी कामरानने म्हटले की, “गतवर्षी मलिकने १-२ सामनेच खेळले होते. परंतु जर तो पाकिस्तानात असता, तर निश्चितपणे आतापर्यंत त्याने भरपूर क्रिकेट खेळले असते. परंतु भारतीय बोर्डाने समजदारी दाखवत त्याला आयपीएलमध्ये एक पूर्ण हंगाम खेळण्याची संधी दिली.”
दरम्यान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये ११ सामने खेळताना १५ विकेट्स घेतल्या आहेत. याउलट त्याला गतवर्षी केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने फक्त २ विकेट्स चटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनी जर खेळणार नसेल, तर त्याने मेंटर किंवा कोच व्हावं”
मोठ्या विजयानंतरही मयंक दिसला नाराज, विराटने काढली समजूत; पाहा दोघांमधील संभाषणाचा Video