पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम आगामी टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करेल. हा दुसरा विश्वचषक असेल, ज्यामध्ये आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करेल. आझम पाकिस्तानसाठी एक चांगला कर्णधार सिद्ध झाला आहे. टी20 विश्वचषक 2021 मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यापर्यंत गेला होता. मात्र आशिया चषक 2022 मध्ये संघाचे अपयश आणि आझमचा खराब फॉर्म यामुळे त्याला टिकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल यानेही आझमवर टिका केली आहे.
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) आझमला (Babar Azam) पाकिस्तान संघाचा कर्णधार न बनण्याचा सल्ला दिला (Pakistan Captain Babar Azam) होता. विराट कोहली (Virat Kohli) किंवा स्टिव्ह स्मिथ यांच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पाकिस्तानची धुरा सांभाळावी असे त्याचे म्हणणे होते. याबद्दल अकमलने त्याच्या यूट्यूब चॅनलवर उलगडा केला आहे.
अकमल म्हणााल की, “फैसलाबादमध्ये एका टी20 सामन्यादरम्यान जेव्हा आझम नाणेफेकीसाठी बाहेर जात होता, तेव्हा मला माहिती झाले की त्याला पाकिस्तानचा कर्णधार बनवले आहे. तेव्हाच मी त्याला म्हणालो होतो की, मला नाही वाटत तू आताच पाकिस्तानचा कर्णधार बनण्याची योग्य वेळ आहे.”
“मी त्याला म्हणालो होतो की, त्याने अजून पुढील 2-3 वर्षे फलंदाजीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे. विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथच्या पातळीपर्यंत पोहोच. 30-40 शतके कर आणि मग कर्णधारपदाचा आनंद लुट. जेव्हा सरफराज अहमद नेतृत्त्वपदावरून राजीनामा देईल, तेव्हाच तुझी बारी येईल. ही योग्य वेळ नाही. मी त्याला हा चांगला सल्ला दिला होता, परंतु त्याच्या आसपासच्या लोकांनी कदाचित त्याला सांगितले की, हीच कर्णधार बनण्याची योग्य वेळ आहे आणि त्याने त्यांचे ऐकले”, असे पुढे अकमल म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! सॅमसन बनला भारताचा कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मिळाली जबाबदारी
बाबर आझमच्या टेंशनमध्ये वाढ, पाकिस्तानच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी दिवसेंदिवस होतेयं मोठी
रॉयल लाईफ जगतो टेनिसचा सम्राट, फेडररपुढे धोनी-कोहलीची कमाई चिल्लर; आकडा तर ऐका