ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू केन रिचर्डसन आणि ऍडम झम्पा यांनी उर्वरित हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा यंदाच्या आयपीएल हंगामात भाग होते. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनतर त्यांनी मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियात प्रयाण करण्याचे देखील ठरवले होते. मात्र आता ते मुंबईत अडकल्याचे वृत्त समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने देशात येणाऱ्या विमानांवर निर्बंध घातल्याने या दोन खेळाडूंची अडचण झाली असल्याचे समजते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारशी चर्चा करत असून लवकरच त्यांच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार झाम्पा आणि रिचर्डसन हे २५ एप्रिलला बायो बबल मधून बाहेर पडले होते. त्यांनी मुंबईच्या एअरपोर्ट जवळील एका हॉटेलमध्ये आपले वास्तव्य हलवले होते. त्यांनतर ते मायदेशी जाण्यासाठी विमान पकडणार होते. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने देशात येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली असल्याने आता त्यांची अडचण झाली आहे. ही बंदी १५ मेला संपणार असून कदाचित त्यांनतरच या दोघांना मायदेशी परतता येईल, अशी शक्यता आहे.
रिचर्डसन आणि झाम्पाला फारशी मिळाली नव्हती संधी
आयपीएल २०२० मध्ये ४ कोटींची किंमत मोजत विकत घेतलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज रिचर्डसनला या हंगामात केवळ एक सामना खेळायला मिळाला होता. या सामन्यात त्याने १ विकेट चटकावली होती. तर आधारभूत किंमतीत ताफ्यात घेतलेल्या झम्पाला अद्याप या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या दोघांनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगितले होते तरी भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : आवेश खानने केली विराटची शिकार, कर्णधार झाला क्लीन बोल्ड
टी२० क्रिकेटमध्ये १२ धावांचा फटका असावा, दिग्गजाने केली मागणी
ब्रेट लीचेही पॅट कमिन्सच्या पावलावर पाऊल, भारताला केली तब्बल इतक्या रुपयांची मदत