ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यांनी सुपर 12च्या 37व्या सामन्यात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. हा सामना न्यूझीलंडच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. त्याचबरोबर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचला. आकडेवारी पाहिली तर केन विल्यमसन याचे नेतृत्व जबरदस्त ठरले आहे.
न्यूझीलंडची कामगिरी पाहिली तर 2015पासून जेवढ्या आयसीसी स्पर्धा खेळवण्यात आल्या त्यातील प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी उत्तमच राहिली आहे. त्याचबरोबर 2016मध्ये केन विल्यमसन (Kane Williamson) कर्णधार झाला, तेव्हापासून त्यांनी विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये स्थान पक्के केलेच आहे. मग तो विश्वचषक क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील असो. त्यातच टी20 विश्वचषकाचा आठवा हंगाम खेळला जात आहे.आतापर्यंत न्यूझीलंड चार वेळा वेळा टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला. त्यातील एकट्या विल्यमसनच्या नेतृत्वाखाली संघ तीन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला.
टी20 विश्वचषक 2016चा हंगाम भारतात खेळला गेला. त्या स्पर्धेच्या काही महिन्यांआधीच विल्यमसनची न्यूझीलंडच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली. कारण 2016मध्ये वर्षाच्या सुरूवातीलाच ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
Kane crushes one for fifty!
We can now reveal that this six from captain Kane Williamson is one of the moments that will be featured as a Crictos of the Game by @0xFanCraze
Visit https://t.co/8TpUHbyGW2 to own iconic moments from every game. pic.twitter.com/Jmmmjqw8tq
— ICC (@ICC) November 4, 2022
मॅक्युलमच्या निवृत्तीनंतर विल्यमसन न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड टी20 विश्वचषक 2016च्या हंगामात उपांत्य फेरीत पोहोचला. त्यावेळी ते 2007नंतर पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यांना इंग्लंडकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
A fantastic half-century 👏
Kane Williamson was adjudged the @aramco POTM in #IREvNZ 🙌#T20WorldCup pic.twitter.com/rNEvRLU8Is
— T20 World Cup (@T20WorldCup) November 4, 2022
मागील वर्षी खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात तर न्यूझीलंडच्या संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. तेव्हाही विल्यमसनच कर्णधार होता. त्या स्पर्धेत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. आता आठव्या टी20 विश्वचषकातही त्यांनी उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यंदा तरी ते विजेतेपदावर नाव कोरतील की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
New Zealand become the first team to qualify for the #T20WorldCup 2022 semi-finals 🔥
— ICC (@ICC) November 4, 2022
त्याचबरोबर विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2019 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तेव्हा ते उपविजेते ठरले होते. त्याचबरोबर 2021मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पदार्पणाची आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप जिंकली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय