मुंबई । न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वात चाणाक्ष क्रिकेटपटू मानला जातो. तो एक उत्कृष्ट फलंदाज असण्याबरोबरच एक सज्जन व्यक्ती देखील आहे. विल्यिमसनने नुकतेच भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यांच्यासोबत बोलताना इंडियन प्रीमियर लीगचे कौतुक केले आहे.
विल्यिमसन म्हणाला, ” सुरुवातीला या लीगविषयी खूपच उत्सुकता होती. ही सर्वात मोठी लीग आहे. जी मी पाहिली आहे. अनुभवली आहे. येथे बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. या लीगपासूनच अनेकांनी त्यांच्या देशात लीग सुरू केले आहेत. भारत देशात क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे. हे पाहणे आमच्यासाठी एक अद्भुत गोष्ट आहे.”
2018 साली डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत सनरायजर्स हैदराबादचे विल्यम्सने नेतृत्व केले होते आणि एमएस धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचे आणि आयपीएल फ्रेंचाइजी संघाचे नेतृत्व करताना दोन्ही गोष्टीत नेमके काय अंतर आहे?याचा देखील त्याने खुलासा केला.
“न्यूझीलंड आणि आयपीएल फ्रेंचायजीचे नेतृत्व करणे खूपच वेगळे आहे. मला सुरुवातीला काय करायला हवे हे समजत नव्हते. ही भारतीय लीग आहे. एका वेगळ्या संस्कृतीत आपण येऊन क्रिकेट खेळत आहोत. सर्वच संघाकडे चांगला अनुभव आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना एक सुखद हंगाम होता,” असे विल्यिमसनने सांगितले.
विलियमसन आतापर्यंत आयपीएलचे 41 सामने खेळले आहेत. ज्यात 38.29च्या सरासरीने 1,302 धावा केल्या आहेत.