दिग्गज फलंदाज केन विलियम्सन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. नुकतेच त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 2021 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडला विजेतेपद मिळवून देणारा विलियम्सन हा मर्यादित षटकांच्या संघांचा कर्णधार म्हणून कायम राहील. नेतृत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्याने आता एक सोशल मीडिया पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली.
विलियम्सनने 2016 मध्ये ब्रेंडन मॅक्युलम याच्याकडून जबाबदारी स्वीकारल्यापासून 38 वेळा कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये संघाने 22 विजय, 10 पराभव आणि 8 सामने ड्रॉ राहिले. आता त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाचे नेतृत्व करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमकडे देण्यात आली आहे.
नेतृत्व सोडल्यानंतर केलेल्या आपल्या पहिल्या सोशल मीडिया हँडलवर त्याने एक छायाचित्र पोस्ट केले. यामध्ये तो नवनियुक्त कर्णधार साऊदीसह दिसून येत आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले,
https://www.instagram.com/p/CmLYvylKPGs/?igshid=YmMyMTA2M2Y=
“गेल्या साडेसहा वर्षांत न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि बहुमानाची गोष्ट ठरली. या भूमिकेने मला खूप काही शिकवले आहे. अनेक अनुभवांसाठी मी कृतज्ञ आहे. मात्र, मला वाटते की कोणीतरी दुसरे एक पाऊल टाकून संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. या भूमिकेसाठी मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. कसोटी क्रिकेटला मी नेहमीच प्राधान्य देत आलो आहे. मी संघाला पुढील वाटचालीत मदत करण्यास उत्सुक आहे.”
केन विलियम्सन याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम पाच फलंदाजांपैकी एक मानले जाते. पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेपासून न्यूझीलंड संघ साऊदीच्या नेतृत्वात खेळेल.
(Kane Williamson First Post After Resign Test Captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकण्यापूर्वी अर्जुनला वडील सचिनने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणालेला, ‘जा आणि…’
अरे हा अमेरिकेचा की भारताचा संघ? यूएसएच्या अंडर 19 टीमवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया