सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात न्यूझीलंडने दमदार कामगिरी केली. दरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार फलंदाजी करत नाबाद 113 धावा केल्या. या खेळीनंतर विल्यमसनने एक मोठा रेकाॅर्ड केला आहे.
केन विल्यमसन (Kane Williamson) आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7,000 धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. याआधी हा रेकाॅर्ड विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर होता. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण वनडे सामन्यात सर्वात जलद 7,000 धावा करणाऱ्या 3 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
1) हाशिम आमला- वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7,000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी धोकादायक फलंदाज हाशिम आमला (Hashim Amla) अव्वल स्थानी आहे. त्याने आपल्या 150व्या डावात ही कामगिरी केली. आमलाने आपल्या वनडे कारकिर्दीत 27 शतके आणि 39 अर्धशतकांसह 8,113 धावा केल्या.
2) केन विल्यमसन- केन विल्यमसनला (Kane Williamson) वनडे सामन्यात 7,000 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 159 डावांची गरज लागली. 2010 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने आतापर्यंत 167 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 49.65च्या सरासरीने 7,001 धावा केल्या आहेत. विल्यमसनने वनडेमध्ये 14 शतकासह 46 अर्धशतके झळकावली आहेत.
3) विराट कोहली- भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये अनेक रेकाॅर्ड आहेत. कोहली सध्या अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. त्याने वनडे सामन्यात 7,000 धावा पूर्ण करण्यासाठी 161 डाव घेतले. कोहलीने 296 सामन्यात 57.96च्या सरासरीने 13,911 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 72 अर्धशतकांसह 50 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचा संयम सुटला, भर मैदानात डीजेवाल्याला झापलं, VIDEO
चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार पाकिस्तान? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
SA vs NZ; आफ्रिकेला दुसरा एबी डिव्हिलियर्स मिळाला! पठ्ठ्याचे पदार्पणातच विश्वविक्रमी शतक






