आयसीसी वनडे विश्चचषक 2023 मधील 11वा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत शुक्रवारी (13 ऑक्टोबर) चेपॉक स्टेडियमवर आयोजित केली गेली आहे. न्यूझीलंड संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी या सामन्यात खुशखबर हीच आहे की, त्यांचा कर्णधार केन विलियम्सन संघात पुनरागमन करत आहे.
केन विलियम्सन (Kane Williamson) मार्च 2023 नंतर एकही प्रोफेशनल सामना खेळला नाहीये. विश्चषकापूर्वी त्याने दोन सराव सामने खेळळे होते. यातील एका सामन्यात अर्धशतक केले असले तरी, संघ व्यवस्थापनाने विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यासाठी विलियम्सनने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान पक्के केलेच. विल यंग याला विलियम्सनसाठी गाजा रिकामी करावी लागली.
Toss news from Chennai ????
Kane Williamson calls it right at the toss and New Zealand opt to bowl first ????#CWC23 | #NZvBAN ????: https://t.co/kTzaBkEaFO pic.twitter.com/FuuzrXxpaz
— ICC (@ICC) October 13, 2023
न्यूजीलंडने या सामन्यापूर्वी विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे बांगलादेश खेळलेल्या दोन पैकी एक सामना जिंकला, तर एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. पहिल्या दोन सामन्यांमधील विजयानंतर शुक्रवारी (13 ऑक्टोबर) न्यूझीलंड दुसऱ्या, तर बांगलादेश सहाव्या क्रमांकावर आहे. (Kane Williamson is back as New Zealand Captain. And he wins the toss and opt to bowl first. )
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (क), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शाकिब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (डब्ल्यू), तौहिद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
महत्वाच्या बातम्या –
भारताशी सामना करण्यासाठी पाकिस्तानने अवलंबली जुनी पद्धत, स्पॉट बॉलिंगचा केला सराव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी! मागच्या चार मॅचची आकडेवारी मान खाली घालायला लावणारी