न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्या फिटनेसबाबत चांगली बातमी समोर येत आहे. यावर्षी वनडे विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार आहे. केन विलियम्सन याने न्यूझीलंडच्या विश्वचषक संघात स्थान मिळवले असून आता तो संघासाठी सराव सामने खेळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः विलियम्सनकडून देखील याविषयी संकेत मिळाले आहेत.
भारतात होणार वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळवले जाणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सराव सामना 29 सप्टेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. या सामन्यात कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) खेळताना दिसू शकतो. इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) दरम्यान विलियम्सनला दुखापत झाली होती. हंगामातील पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्ससाठी खेळताना विलियम्सन दुखापतग्रस्त झाला होता. मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये त्याने क्रिकेट खेळले नाहीये. पण विश्वचषक संघात स्थान मिळवण्याआधी स्वतःची फिटनेस सिद्ध केली आहे.
विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ भारताला रवाना होण्याआधी विलियम्सनने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्याने सांगितले, “सराव सामन्यात भाग घेण्याची योजना आहे. हा सामना खेळण्याची खूप इच्छा आङे. सध्या मी माझ्या रिहॅबकडे लक्ष देत आहे. वेळ मिळेल तसा धावत आहे, क्षेत्ररक्षणाचा सराव करत आहे. तसेच फलंदाजीचा सराव सुरूच आहे.”
दरम्यान, केन विलियम्सन न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि विश्वचषकातील त्याचा अनुभव मोठा असल्यामुळे संघासाठी त्याची उपस्थिती महत्वाची ठरते. आगामी वनडे विश्वचषकात देखील विलियम्सन संघासाठी महत्वपूर्ण योगदान देईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. (Kane Williamson is likely to play warm-up games of World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Countdown: वर्ल्डकपला रोहित खेळतोच बर का! ही आकडेवारी पाहाच
IND vs AUS । रोहितने पाडला षटकारांचा पाऊस, अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत अर्धशतक पूर्ण