---Advertisement---

विराट कोहलीचा हा नवा मित्र आहे खास, फोटो शेअर करत…

On: रविवार, मे 24, 2020 7:50 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहतो. कधी तो स्वतः व्यायाम करतानाचे फोटो पोस्ट करतो तर कधी अनुष्कासोबतचा फोटो शेअर करतो. नुकतेच विराटने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आणि एक सुंदर कॅप्शन फोटो दिले आहे.

विराट कोहलीने शेअर केलेला फोटो न्यूझीलंड दौऱयावर मैदानात टॉससाठी जातेवेळी काढलेला आहे. फोटोमध्ये विराट केन विल्यम्सनच्या पाठीवर हात ठेवला असून फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपल्यासोबत घालवलेला वेळ खूप चांगला अनुभव. एक चांगला माणूस.

विराट कोहली आणि केन विल्यम्सन हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. न्यूझीलंड दौर्यावर एकदिवसीय मालिकेमध्ये विराट आणि केन विल्यम्सन सीमारेषांच्या जवळ बोलत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विराटने सामन्यानंतर विल्यमसन बरोबर काय संवाद सुरु होता हे विचारला असताना म्हणाला की, विल्यम्सन आणि मी एक सारखे विचार करतो. दोघांची मानसिकता एकसारखे आहे. तो माझा चांगला मित्र आहे.

काही दिवसांपूर्वी विल्यम्सनने देखील विराटच्या बाबतीत बोलताना म्हणाला की विराट विरुद्ध खेळताना आणि त्याला खेळताना पाहताना खूप काही शिकायला मिळते. त्याने स्वतःला एका मोठ्या स्तरावर पोहोचवले आहे. अनेकदा त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवला आहे.

गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभव करून अंतिम फेरीत गाठली होती. काही महिन्यांपूर्वी भारताने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. दौर्‍यात भारताने टी-20 मालिका 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. मात्र, एक दिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेत भारताचा न्यूझीलंडने दारुण पराभव केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---