---Advertisement---

देशापेक्षा आयपीएल महत्वाची! महत्वाच्या वनडे मालिकेतून दोन दिग्गजांची माघार

On: मंगळवार, मार्च 14, 2023 2:51 PM
KL-Rahul-Kane-Williamson
---Advertisement---

केन विलियम्सन आणि टिम साउदी आगामी आयपीएल हंगामात खेळण्यासाठी मायदेशात श्रीलंका संघाविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार नाहीत. आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार असून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विलियम्सन, साउदीसह डेवॉन कॉन्वे आणि मिचेल सॅटनर यांनाही भारतात जाण्याच्या परवानगी दिली आहे.

श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिला कसोटी सामना सोमवारी (13 मार्च) न्यूझीलंडने जिंकला. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 मार्च) सुरू होणार आहे. शुक्रवारी सुरू होणारा हा सामना खेळल्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson ), टिम साउदी (Tim Southee), डेवॉन कॉन्वे आणि मिचेल सॅटनर यांना राष्ट्रीय संघाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल. त्यानंतर हे चारही खेळाडू आपल्या आयपीएल फ्रँचायझीसोबत जोडले जाऊ शकतात.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना 25 मार्च रोजी ऑकलँडमध्ये खेळला जाईल. या सामन्यानंतर न्यूझीलंडचे तीन अजून खेळाडू फिन एलन (आरसीबी), लॉकी फर्ग्यूसन (केकेआर) आणि ग्लेन फिलिप्स (सनरायझर्स हैदराबाद) भारतासाठी रवाना होतील. दरम्यान आयपीएल 2023चा पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. विलियम्सनच्या अनुपस्थिती न्यूझीलंड क्रिकेटने वनडे संघाचे कर्णधारपद टॉम लॅथम याच्याकडे सोपवले आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 28 मार्च मार्च रोजी क्राईस्टचर्चमध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी संघात मार्क चॅपमॅन, बेन लिस्टर आणि हेनरी निकोल्स यांना सामील केले जाईल. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलेल्या या संघात टॉम ब्लँडेल आणि विल यंग यांचे पुनरागमन झाले आहे. संघात चाड बोवेस आणि वेन लिस्टर हे नवीन चेहरेही आहेत.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1635388477251411968?s=20

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ –
टॉम लाथम (कर्णधार), फिन एलन (ODI 1), टॉम ब्लंडेल, चाड बोवेस, माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन (ODI 2&3), लॉकी फर्ग्यूसन (ODI 1) मैट हेनरी, बेन लिस्टर (ODI 2&3), डारेल मिचेल, हेनरी निकोल्स (ODI 2&3), ग्लेन फिलिप्स (ODI 1), हेनरी शिप्ले, ईश सोढी, ब्लेयर टिकनर, विल यंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल
मोठी बातमी । भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव स्मिथ बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार! 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---