रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात न्यूझीलंड संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंवर दबाव बनवून ठेवला होता. परिणामी भारतीय संघाला या सामन्यात ८ गडी राखून परभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना झाल्यानंतर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने मोठी प्रतिक्रिया दिली.
हा सामना झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने म्हटले की, “प्रत्येक सामन्यापूर्वी एक रणनिती आखली जाते. परंतु भारतीय संघासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आम्ही अष्टपैलू कामगिरी करून विजय मिळवला आहे. आम्ही संपूर्ण सामन्यात त्यांच्यावर दबाव बनवून ठेवला होता. त्यानंतर आमच्या सलामीवीर फलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली.”
तसेच आपल्या संघातील गोलंदाजांचे कौतुक करताना केन विलियम्सन म्हणाला की, “आमच्या संघात २ फिरकी गोलंदाज आहेत. या दोघांनीही अप्रतिम कामगिरी केली आहे. ईश सोढी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अप्रतिम गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाज आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. आम्ही नेहमीच बलाढ्य संघांविरुद्ध खेळत असतो आणि स्वतःला सिद्ध देखील करत असतो. आम्ही आमच्या क्रिकेटच्या ब्रँडसाठी वचनबद्ध आहोत. आमच्या खेळाडूंनी याचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. ईश सोढी जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळला आहे. आता आम्ही साखळी फेरीतील येणाऱ्या सामन्यांचा विचार करत आहोत.”
Kane Williamson cut a happy figure after #NewZealand's big win over India 😁
Hear what the @BLACKCAPS skipper had to say post-match 📺#T20WorldCup pic.twitter.com/x0v6rnUzq6
— T20 World Cup (@T20WorldCup) October 31, 2021
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने २३ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.परिणामी भारतीय संघाला २० षटक अखेर अवघ्या ७ बाद ११० धावा करण्यात यश आले.
या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला होता. परंतु याचा कुठलाही परिणाम न्यूझीलंड संघातील इतर फलंदाजांवर जाणवला नाही. न्यूझीलंड संघाकडून मिचेलने सर्वाधिक ४९ आणि केन विलियम्सनने ३३ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’
भारतीय संघाचे ‘तारे जमीन पर’, संतप्त चाहत्यांनी विराट आणि संघासहित मेन्टॉर धोनीवर काढली भडास