जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २३ जून रोजी समाप्त झाली. न्यूझीलंड संघ भारताला नमवत पहिलावहिला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनला. पूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर क्रिकेटविश्वाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता मिळाला आहे. यात विजयात कर्णधार केन विलियम्सनचे महत्वाचे योगदान होते. त्याच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता
कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ५२) आणि रॉस टेलर ( नाबाद ४७) यांच्या अप्रतिम खेळीमुळे न्यूझीलंड संघाने बुधवारी (२३ जून) पहिली आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभव केला.
भारतीय संघाला सहाव्या दिवशी दुसऱ्या डावात केवळ १७० धावा करता आल्या होत्या, ज्यामुळे पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेणारा न्यूझीलंड संघाला १३९ धावांचे लक्ष मिळाले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे दोन विकेट केवळ ४४ धावांवर गेले होते. परंतु विलियम्सन आणि टेलरने ९६ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विलियम्सन खूप आनंदी झाला आहे. तो म्हणाला की, ‘आमच्या खेळाडूंनी धैर्य दाखवत प्रथम विश्वविजेतेपद जिंकले. आहे. ही एक विशेष भावना आहे. आम्ही प्रथमच जागतिक विजेतेपद जिंकले आहे. मला विराट आणि भारतीय संघाचे आभार मानायचे आहेत. त्यांचा सघ एक उत्कृष्ट संघ आहे. आम्हाला माहित होते आमच्यासमोर किती आव्हाने येणार होती. परंतु आमच्या संघाने प्रचंड धैर्य दाखवले आणि आम्ही जागतिक कसोटीत अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यास यशस्वी ठरलो. तथापि, दोन्ही संघांतील २२ खेळाडूंनी ज्या भावनेने खेळले ते सर्व कौतुकास पात्र आहेत. ही स्पर्धा आयुष्यभर लक्षात राहील.”
अंतिम सामन्यात बरेच चढउतार होते
विलियम्सन पुढे म्हणाला, ‘आपल्याकडे नेहमीच सर्व स्टार खेळाडू नसतात आणि आम्ही या सामन्यात ते पाहिले. आम्ही विजेतेपदाच्या सामन्यात खेळाडूंचे धैर्य आणि वचनबद्धता पाहिली. आम्हाला माहित आहे की प्रत्येक परिस्थितीत भारत किती बळकट आहे. हा अंतिम सामना खूप अस्थिर होता. तेथे बरेच चढउतार होते आणि संघांच्या काही उणीवा देखील दिसल्या. सहा दिवस कोणत्याही संघाचेही वर्चस्व नव्हते. तरीही आम्ही शेवटी यशस्वी झालो याचा मला आनंद आहे.’
पहिल्या डावात चांगले खेळले होते तळातील फलंदाज
न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, ‘पहिल्या डावात फलंदाजी करणे खूप कठीण होते. परंतु आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी केली. ज्यामुळे आम्हाला आधार मिळाला.’ जेव्हा न्यूझीलंड संघचे १६२ धावांवर ६ गडी बाद झाले होते. त्यावेळी काईल जेमिसन (२१) आणि टीम साऊदीने (३०) संघाला वाचवले. विलियम्सनने रॉस टेलरची प्रशंसा करताना म्हणाला, ‘रॉस खूप अनुभवी आणि शांत खेळाडू आहे. तो या परिस्थितींना चांगल्या प्रकारे समजतो. त्याच्यासोबत शेवटपर्यंत फलंदाजी करणे अप्रतिम होते.’
महत्वाच्या बातम्या
टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण
पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी