---Advertisement---

‘भारत सर्वश्रेष्ठ संघ, आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका,’ केन विलियम्सनची प्रामाणिक कबुली

On: शुक्रवार, जून 18, 2021 8:55 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून (१८ जून) साउथम्प्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने मोठे भाष्य केले आहे.

केन विलियमसनने म्हटले की, “या कालावधीत संघाने भरपूर प्रगती केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक दिवशी संघाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु यातून मार्ग काढत आमचा संघ इथपर्यंत पोहोचला आहे. आता आम्ही आणखी पुढे जाण्याचा विचार करू. इतक्या दिवसात मेहनत केल्यानंतर आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “सर्वात आधी तर आम्ही हा सामना खेळण्यासाठी उत्सुक आहोत. यासाठी बराच काळ गेला आहे. आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहोत त्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला हेही माहित आहे की, भारत जगातील सर्वात मजबूत संघ आहे. त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट संघ मानले जाते. या संघाला आव्हान देणे कठीण असणार आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका.” (Kane Williamson statement before World test championship final)

“हे आम्हा सर्वांसाठी रोमांचक आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व सुरळीत सुरू ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत आणि आम्ही आमच्या भूमिकेबद्दल वचनबद्ध राहण्याचा प्रयत्न करू जे आम्हाला उत्कृष्ट संधी देईल. फक्त खेळाडूंनी यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आम्ही नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे त्याने शेवटी सांगितले.

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन हे दुसऱ्यांदा आयसीसीच्या बाद फेरीत आमने सामने असणार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरी सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत करून भारतीय संघ परतफेड करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा, १९४ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन

ब्रिस्टल कसोटी: स्मृती-शेफालीच्या विक्रमी भागीदारीनंतर भारताची घसरगुंडी, इंग्लंडचे सामन्यात जोरदार पुनरागमन

अंतिम लढतीपुर्वी कोहलीचे भाष्य, म्हणाला, ‘५ दिवसांवरुन काहीही सिद्ध होणार नाही, मागील ५ वर्षे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---