केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. 2021 मध्ये एजेस बाउल येथे भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून देणारा विल्यमसन हा मर्यादित षटकांच्या संघांचा कर्णधार म्हणून कायम राहील.
केन विल्यमसन (Kane Williamson) याने कसोटी संघाचा पदत्याग केल्याने टीम साऊथी (Tim Southee) त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. हा अनुभवी वेगवान गोलंदाज आगामी पाकिस्तान दौऱ्यातच संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेणार आहे.
साऊथीने आतापर्यंत 346 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 22 वेळा टी20 संघाचे नेतृत्व केले आहे, तो या महिन्याच्या पाकिस्तान दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करेल तेव्हा तो न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार बनेल. त्याचबरोबर सलामीवीर टॉम लॅथम याला कसोटी उपकर्णधार म्हणून निश्चित करण्यात आले आहे, यापूर्वी त्याने विल्यमसनच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले होते.
हॅरी केव्ह यांच्यानंतर (1955) अधिकृतपणे न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त झालेला साऊथी हा दुसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहे. डीओन नॅश यांनी 1998-99 मध्ये तीन कसोटी सामन्यांमध्ये स्टीफन फ्लेमिंग यांच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले होते.
विल्यमसनने 2016 मध्ये ब्रेंडन मॅक्युलम याच्याकडून जबाबदारी स्वीकारल्यापासून 38 वेळा कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये संघाने 22 विजय, 10 पराभव आणि 8 सामने ड्रॉ राहिले.
Kane Williamson will step down as captain of the BLACKCAPS Test side, with Tim Southee to take up the leadership mantle. Tom Latham has been confirmed as Test vice-captain, after previously leading the side in Williamson’s absence. #CricketNation https://t.co/D9rPWUl05d
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 14, 2022
कसोटी कर्णधार म्हणून विल्यमसनची सरासरी 57 आहे. केवळ एम क्रो (54) यांचीच न्यूझीलंडसाठी कसोटी कर्णधार म्हणून सरासरी 50 किंवा त्याहून अधिक सरासरी आहे. कर्णधार म्हणून त्या 22 कसोटी विजयांमध्ये विल्यमसनची 8 शतकांसह सरासरी 79 राहिली.
कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रमही विल्यमसनच्या नावावर आहे. त्याने 11 शतके केली आहेत.
न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा कसोटी संघ- टिम साऊथी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), डेवॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, केन विल्यमसन आणि विल यंग.
Squad News | The first Test against @TheRealPCB starts in Karachi on Boxing Day.
More | https://t.co/cZdpKGOgNJ #PAKvNZ pic.twitter.com/urDBlmAURT
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 14, 2022
न्यूझीलंड 2003नंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. Kane Williamson Steps Down New Zealand Test Captain
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA World Cup 2022: मोरोक्कोचा स्वप्नभंग, फ्रांस सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये; अर्जेंटिनाशी भिडणार
घरच्या मैदानावर ओडिशा एफसी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, एटीके मोहन बागानचे आव्हान