---Advertisement---

न्यूझीलंडच्या धुरंदरचे स्वप्न आहे खूप मोठे, करायची आहे मास्टर ब्लास्टर सचिनसोबत…

On: शुक्रवार, सप्टेंबर 11, 2020 7:53 PM
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सन याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरविषयी मोठे वक्तव्य केले आहे. जर त्याला कोणत्या निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूसोबत खेळण्याची संधी मिळाली, तर तो सचिनसोबत खेळेल, असे त्याने म्हटले आहे. Kane Williamson Talks About Playing With Sachin Tendulkar

सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कित्येक मोठ-मोठे विक्रम केले आहेत. त्याच्या खेळीने त्याने जगातील कोट्यावधी लोकांना प्रेरित केले आहे. विलियम्सनदेखील त्या व्यक्तिंपैकी एक आहे. त्याला सचिनसोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर ही त्याच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट ठरेल, असे त्याने म्हटले आहे. विलियम्सनसाठी हे एका स्वप्नाप्रमाणे असेल, जे कधीही पूर्ण होऊ शकणार नाही.

सनराइजर्स हैद्राबादच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बोलताना विलियम्सन म्हणाला की, “जर मला कोणत्या निवृत्त झालेल्या खेळाडूसोबत खेळायची संधी मिळाली तर तो सचिन तेंडूलकर असेल. तो माझा सर्वात आवडता खेळाडू आहे आणि मी त्याला खेळताना पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे सचिनसोबत फलंदाजी करणे खूप शानदार असेल. पण, दुर्भाग्याने मला ही संधी मिळणार नाही.”

“भारतात खेळण्याचा जो अनुभव मिळतो, तो खूप वेगळा असतो. विशेष म्हणजे, भारतात भारतीय संघाविरुद्ध खेळताना आणि आयपीएलमध्ये खेळताना खूप जबरदस्त वातावरण असते. म्हणून मला भारत देशात खेळायला खूप आवडते,” असे विलियम्सनने पुढे बोलताना म्हटले.

विलियम्सन हा आयपीएल २०२०मध्ये सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग आहे. त्याने यापुर्वी हैद्राबाद संघाचे नेतृत्त्व केले आहे आणि कदाचित या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यातही तोच हैद्राबाद संघाचा कर्णधार असू शकतो.

यामागचे कारण म्हणजे, हैद्राबाद संघाचा सध्याचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला संघासोबत सामील होण्यासाठी वेळ लागू शकतो. तो सध्या ऑस्ट्रेलिया संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे आणि हा दौरा संपल्यानंतर १७ सप्टेंबरला तो युएईला रवाना होईल. त्यानंतर त्याला युएईमध्ये ६ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

युएईच्या ‘स्लो टर्निंग’ खेळपट्टीवर चालणार फक्त ‘या’ कर्णधाराची जादू, माजी दिग्गजाचे मोठे विधान

२ कोटी रुपयांना धोनीच्या चेन्नई संघात स्थान मिळालेला खेळाडू करतोय ‘या’ गोष्टीची अपेक्षा

त्रिनबागो नाइट रायडर्स चौथ्यांदा चॅम्पियन; संघ मालक शाहरुखने केला असा आनंदोत्सव साजरा

ट्रेंडिंग लेख –

एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेली अकोल्याचा वाघ गाजवणार आयपीएल

स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---