न्यूझीलंडने भारताविरुद्धचा दुसरा टी20 सामना गमावला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 असे मागे आहेत. त्यातच त्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याला मुकणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सोमवारी (21 नोव्हेंबर) ट्विट करत हि माहिती दिली.
न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा सामना भारताने 65 धावांनी जिंकला. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी न्यूझीलंडला तिसरा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. त्यातच कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याला वैद्यकीय चाचणी करायची असून ती पूर्वनियोजीत होती. या कारणामुळे तो तिसरा सामना खेळणार नाही. त्याच्याजागी संघाच संघात मार्क चॅम्पमन याला घेतले आहे. तो सोमवारी होणाऱ्या सराव सत्रापासूनच संघाशी जोडला जाणार आहे.
विल्यमसनने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या जिंकण्याचा आशा काही प्रमाणात कायम राखण्याचा प्रयत्न केला होता. आता तिसऱ्या सामन्यात तो खेळणारच नसल्याने किवी संघावर त्याचा किती परिणाम होईल, हे कळेलच. या मालिकेतील तिसरा सामना नेपियर येथे मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे.
प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की या वैद्यकीय चाचणीचा विल्यमसनच्या कोपराच्या दुखापतीच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. “केन काही काळापासून ही चाचणी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु दुर्दैवाने ते आमच्या वेळापत्रकात बसू शकले नाही,” असे स्टेड म्हणाले.
https://twitter.com/BLACKCAPS/status/1594511641265475584?s=20&t=BPoxq4wLeAX9AzupTCNYmw
दुसऱ्या सामन्यात विल्यमसनने 52 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. या सामन्यात साउथीने 4 षटकात 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता मालिका बरोबरीत करण्यासाठी विल्यमसन तिसऱ्या सामन्यात नसल्याने त्याच्याजागी टीम साउथी संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच तिसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला किंवा पूर्ण नाही होऊ शकला तर भारत मालिका जिंकेल. Kane Williamson to miss third T20 against India, captaincy goes to Tim Southee
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एफसी गोवाने हिरो आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानला प्रथमच नमवले; चाहत्यांचे मन जिंकले
विजयानंतर सूर्याने स्वतः सांगितले वादळी खेळीमागचे कारण, काय म्हणाला जाणून घ्याच