न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना यजमान न्यूझीलंड संघाने 21 धावांनी जिंकला. फिन एलन याने केलेल्या 74 धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. पण कर्णधार केन विलियम्सन याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. विलियम्सनची ही दुखापत न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 विकेट्सच्या नुकसानावर 194 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 173 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. केन विलियम्सन मागच्या काही महिन्यांत दुखापतीमुळे बहुतांश वेळ संघातून बाहेर राहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या दिग्गजाला सीमारेषेजवळ श्रेत्ररक्षण करताना केन विलियम्सन (Kane Williamson) याला दुखापत झाली होती. विलियम्सनने पुढच्या सहा महिन्यांमध्ये फिटनेसवर काम केले आणि विश्वचषक संघात सामील झाला.
न्यूझीलंड क्रिकेटच्या माहितीनुसार केन विलियम्सन रविवारी (14 जानेवारी) पाकिस्तानविरुद्ध खेळताना बाद होण्याआधी तंबूत परतला. तसेच संघाचा नियमित कर्णधार क्षेत्ररक्षण करण्यासाठीही मैदानात परतला नाही. त्याच्या जागी टिम साऊदी याने कर्णधाराची भूमिका पार पाडली. विलियम्सन याने या सामन्यात 15 चेंडूत 26 धावांची खेळी केली. यात तीन चौकार आणि एक षटकार त्याने मारला. पण कर्णधार लयीत आल्याचे वाटत असतानाच तो रिटायर्ड हर्ट झाला.
Kane Williamson will not return to the field in KFC T20I 2 in Hamilton as a precautionary measure after experiencing tightness in his right hamstring while completing a run in the 10th over and retiring hurt. #NZvPAK pic.twitter.com/4KMF1fMmBN
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 14, 2024
विलियम्सनच्या दुखापतीबीबत न्यूझीलंड क्रिकेट सविस्तर पोस्ट केली. या पोस्टमध्ये सांगितले गेले की, 10व्या षटकात धाव घेताना विलियम्सनच्या हेमस्ट्रिंगवर तान आला. याच कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मैदानातून बाहेर नेले गेले.
दरम्यान, विलियम्सन मागच्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला. टी-20 मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याला निवडले गेले होते. पण वैद्यकीय सल्ल्यामुळे त्याला विश्रांतीवर पाठवले गेले. या मालिकेनंतर विलियम्सन पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघात परतला. पण मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात त्याला ही दुखापत झाली. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात विलियम्सनने पाकिस्तानविरुद्ध 57 धावांची खेळी केली होती. (Kane Williamson was injured in the second T20 match against Pakistan.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG: इंदोरमध्ये कुलदीप ठरलाय खूपच घातक, अफगाणिस्तान संघाचं वाढू शकतं टेन्शन
Ranji Trophy: इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेअगोदर मयंकचा रणजीत धुमाकुळ, ठोठावलं भारतीय संघाचं दार






