न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन हा गंभीर दुखापतीनंतर वेगाने रिकव्हर होताना दिसत आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला गेला आहे. अशात विलियम्सनची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. असे असले तरी विश्वचषकात विलियम्सन खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीचे काही सामने नाही खेळला तरी, विलियम्सन हा संघाचा भाग असेल असे सूतोवाच मिळत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) गुजरात टायटन्स (Hardik Pandya) संघाचा भाग होता. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील संघाने हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. या पहिल्याच सामन्या विलियम्सन सीमारेषेजवळ झेल पकडताना दुखापतग्रस्त झाला. विलियम्सनची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला दीर्घ काळ संघातून बाहेर रहावे लागले.
काही दिवसांपूर्वी त्याने सरावाला सुरुवात केली असून, तो न्यूझीलंड संघात सामील देखील झाला आहे. तो अद्याप मॅच फिट नसला तरी, आता मी वनडे विश्वचषकापर्यंत तो पूर्ण फिट होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर विश्वचषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसवण्याची तयारी देखील न्यूझीलंड संघांनी केली आहे. या सर्व परिस्थितीत त्याला विश्वचषक संघात सहभागी करून घेण्यास बोर्ड अनुकूल आहे.
न्यूझीलंड संघ या विश्वचषकात टॉम लॅथम याच्या नेतृत्वात उतरेल. न्यूझीलंडने 2015 वनडे विश्वचषक व 2019 वनडे विश्वचषक या दोन्ही स्पर्धांची अंतिम फेरी खेळली होती. मात्र, दोन्ही वेळी विजेतेपद जिंकण्यात त्यांना अपयश आले. न्यूझीलंडचे बरेच खेळाडू भारतात आयपीएल खेळत असल्याने यावेळी देखील त्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.
(Kane Williamson will be considered for the 2023 World Cup, even if he misses the early stages of the tournament)
महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला मोकळीक! विना प्रशिक्षक खेळणार टी20 मालिका
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!