वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. भारताचा 20 वर्षीय तिलक वर्मा याने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिलकचा फॉर्म जबरदस्त असून कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेत विराट कोहली याचा मोठा विक्रम त्याच्याकडून मोडीत निघू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा (Tilak Verma) याने 39 धावा केल्या होत्या. मालिकेतील हा पहिला सामना असून पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 51 आणि 49 धावांची खेळी केली. यजमान संघ वेस्ट इंडीज या मालिकेत सध्या 2-1 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने वेस्ट इंडीजने, तर तिसरा सामना भारताने जिंकला. मालिका जिंकण्यासाठी भारताला शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तिलक वर्मा याने मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये 139 धावा केल्या असून विराट कोहली (Virat Kohli) याचा मोठा विक्रम त्याच्या निशाण्यावर आहे.
तिलक वर्मा एखाद्या द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरू शकतो. हा विक्रम सध्या विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. तिलक वर्मा वेस्ट इंडीजविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या सामन्यात आपली लय कायम ठेऊ शकला, तर विराटचा हा विक्रम देखील मोडू शकतो. यासाठी तिलकला अजून 93 धावा हव्या आहेत. सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल (KL Rahul) आहे, ज्याने 2019-20मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 224 धावा केल्या होत्या. एखाद्या द्विपक्षीय मालिकेत भारताकडून 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्यांमध्ये सध्या विराट आणि राहुलव्यतिरिक्त ईशान किशण (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची नावे आहेत. तिलक या यादीत नव्याने सामील होण्याची पूर्ण शक्यता आहे. (Tilak Verma is all set to break Virat Kohli’s record in the T20I series against the West Indies)
द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारताकडून सर्वोत्तम प्रदर्शन करणारे फलंदाज
विराट कोहली (231 धावा) – विरुद्ध इंग्लंड (2020-21)
केएल राहुल (224 धावा) – विरुद्ध न्यूझीलंड (2019-20)
ईशान किशन (206 धावा) – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022)
श्रेयस अय्यर (204 धावा) – विरुद्ध श्रीलंका (2021-22)
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद आमिर संघात परतणार का? वर्ल्डकप 2023 पूर्वी पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी केले मोठे वक्तव्य
विश्वचषकात शिखर धवन पार पाडू शकतो प्रमुख भूमिका, आकडेवारी वाचून कळेल महत्व