न्यूझीलंडचे खेळाडू टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतात टी२० आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी पोहचले आहेत. बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे, त्यामुळे तो थेट कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.
विलिमयम्सन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी२० मालिकेत खेळणार नाही. बाकी टी२० विश्वचषकात खेळलेल्या न्यूझीलंड संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही. टी२० मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊथी न्यूझीलंड संघाचे नेतृत्त्व करेल.
सध्या विलियम्सन केवळ कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. दरम्यान, ट्रेंट बोल्ट केवळ टी२० मालिका खेळणार आहे, तर साऊथीसह काईल जेमिसन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर हे खेळाडू टी२० आणि कसोटी अशा दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंड संघाचा भाग असणार आहेत.
याशिवाय न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने लॉकी फर्ग्यूसनच्या दुखापतीबद्दल माहिती देताना सांगितले की तो दुखापतीतून सावरत असून टी२० मालिकेसाठी उपलब्ध राहाण्याची अपेक्षा आहे.
टी२० मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे रांची आणि कोलकाता येथे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे. यानंतर २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूरला पहिला कसोटी सामना होईल. ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईत दुसरा कसोटी सामना होणार आहे. कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग असेल.
असे आहेत न्यूझीलंड संघ
टी२० मालिका – टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी, टिम साऊथी.
कसोटी मालिका – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काईल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, विल सोमरविल, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! जोश हेडलवूड ‘हा’ विक्रम करणारा युवराज सिंगनंतर जगातील दुसराच खेळाडू
कर्णधार असावा तर असा! धोनीच्या ‘त्या’ शब्दांनी युवा ऋतुराज गायकवाडमध्ये भरला होता आत्मविश्वास
अमेरिकेला मिळू शकते २०२४ टी२० विश्वचषकाचे यजमानपद, ‘हे’ आहे मोठे कारण