---Advertisement---

जवळचा संघ सहकारी हरपल्याने कपिल देव भावुक, मुलाखतीदरम्यान ढसाढसा रडले

Kapil Dev
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी (१३ जुलै) निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय संघाला १९८३ मध्ये पहिलावहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार व यशपाल शर्मा यांचे सहकारी कपिलदेव यांना प्रतिक्रिया देताना आपले अश्रू अनावर झाले.

कपिल देव यांना कोसळले रडू
यशपाल शर्मा यांचे दिल्ली येथे हृदयविकाराचा झटका आल्याने आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व क्रिकेट जगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यशपाल शर्मा हे भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. त्या संघाचे कर्णधार असलेले कपिल देव यांनी यशपाल शर्मा यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना कपिल देव म्हणाले, “मी ही गोष्ट स्वीकारू शकत नाही. अंत्यदर्शनासाठी मी मुंबईवरून दिल्लीला लवकरच पोहचेल. लव यु यश, उत्तम खेळ खेळलास” असे बोलताना कपिल देव स्वतःला रोखू शकले नाहीत व रडू लागले. कपिल देव हे व्यावसायिक कामासाठी सध्या मुंबईमध्ये असून, ते लवकरच अंतिम दर्शनासाठी दिल्लीला पोहोचतील.

भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये होतो समावेश
यशपाल शर्मा हे ८० च्या दशकातील उत्कृष्ट अष्टपैलू मानले जातात. १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ८९ धावांची खेळी करून वेस्ट इंडीजला पराभूत करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीत देखील इंग्लंड विरुद्ध त्यांनी अर्धशतक ठोकले होते. बॉब विलिस यांना मारलेला अप्रतीम फ्लिक षटकार क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाहीत. यशपाल शर्मा यांचे पुतणे व माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा हे सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

दु:खद बातमी! भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बापरे! ‘दादा’चे तब्बल ३६ कोटी रुपये देत नाहीयेत ‘या’ दोन कंपन्या; कोर्टात घेतली धाव

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज क्रिकेटर नवज्योत सिद्धू करणार पक्षांतर, ‘आप’शी मिळवणार हात?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---