भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवनावर बरेच हिंदी चित्रपट निघाले आहेत. यामध्ये एमएस धोनीच्या बायोपिक ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ आणि सचिन तेंडुलकरच्या बायोपिक ‘सचिन- अ बिलियन ड्रीम’ यांचा समावेश आहे. यानंतर भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जिवनावर आधारित ८३’ हा हिंदी चित्रपट येणार आहे. तसा हा चित्रपट भारतीय संघाच्या १९८३मधील विश्वविजेतेपदावर आधारित आहे.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ‘रणवीर सिंग’ याने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १० एप्रिललाच प्रकाशित (रिलीज) होणार होता. परंतु, कोविड-१९मुळे करण्यात आलेल्या लॉकडानला लक्षात घेता, या चित्रपटाचा प्रकाशनाची तारिख पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु, अभिनेता रणवीर सिंग आपल्या या चित्रपटाकडे दर्शकांचे लक्ष वेधण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. दरम्यान एका मोठ्या बातमीचा खुलासा झाला आहे.
ती बातमी अशी आहे की, १९८३सालच्या विश्वचषकावर आधारित या चित्रपटाचा भाग केवळ कपिल देवच नव्हे तर त्यांची मुलगी अमिया देव हीदेखील आहे. आपल्या वडिलांच्या बायोपिकमधून अमिया दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांची सहाय्यक दिग्दर्शक (असिस्टेंट डायरेक्टर) आहे. Kapil Dev Daughter Amiya Dev Debut In Direction Through 83′ Bollywood Movie
८३’ या चित्रपटात भारताचे माजी क्रिकेटपटू संदिप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हादेखील आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमियाविषयी बोलताना चिराग म्हणाला की, “आम्ही चित्रपटाच्या निमित्तानेच एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो. ती दिल्लीची रहिवासी आहे आणि मी मुंबईचा. ती वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे. अमिया आमच्या रोजच्या सराव सेशनमध्ये सहभाग घेत असायची. चित्रपटाच्या शूटींगवेळी अमिया दिग्दर्शन टीमचा प्रमुख भाग होती.”
“अमिया सेटवर कलाकरांना सर्व मिटिंगची माहिती देत असायची. ती सतत कबीर खान यांना दिग्दर्शनासंबंधी प्रश्न विचारत असायची आणि कलाकारांच्या गोष्टीही व्यवस्थित ऐकायची. शिवाय तिने कलाकरांच्या कॉस्ट्यूम आणि वेळापत्रकाचे नियोजनाची जबाबदारीही पार पाडली होती,” असे पुढे बोलताना चिराग म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
बापरे! २ चेंडूत हॅट्रिक विकेट घेणारा जगातील एकमेव गोलंदाज, पहा कसा…
३ वनडे व ३ टी२० सामने ‘या’ देशाबरोबर खेळण्यासाठी टीम…
वर्णभेदाविरुद्धच्या लढाईत आता चेन्नई सुपर किंग्जचा स्टार झाला सहभागी