1983 सालच्या क्रिकेट विश्वचषकावर (1983’s World Cup) आधारित रणवीर सिंगचा ’83’ हा चित्रपट (83 Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव(Kapil Dev) यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात रणवीरने कपिल यांच्यासारखाच नटराज शाॅट (Natraj Shot) मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा एक फोटो सोमवारी (11 नोव्हेंबर) रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोमवारी (11 नोव्हेंबर) रणवीर सिंगने (Ranveer Singh) नटराज शाॅट मारण्याचा प्रयत्न करत असणारा फोटो शेअर केला आहे.
NATRAJ SHOT 🏏 #RanveerAsKapil 🇮🇳 @therealkapildev @kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar @madmantena #SajidNadiadwala @vishinduri @RelianceEnt @FuhSePhantom @NGEMovies @vibri_media @ZeeMusicCompany pic.twitter.com/RQDlyOKtas
— Ranveer Singh (@RanveerOfficial) November 11, 2019
कपिल यांनी 1983 च्या विश्वचषकात मारलेला नटराज शॉट प्रसिद्ध आहे. त्यांनी झिंबाब्वे विरुद्ध खेळताना नाबाद 175 धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी नटराज शाॅट खेळला होता.
या चित्रपटातील नटराज शाॅट मारतानाचा फोटो शेअर केल्यानंतर बाॅलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून रणवीरला अनेक शुभेच्छा मिळाल्या.
त्याचबरोबर त्याला यातील अप्रतिम कमेंट कपिल देव यांनी केली आहे. “हॅट्स ऑफ रणवीर,” असे रणवीरची पोस्ट रिट्वीट करत कपिल देव यांनी असे लिहिले आहे.
Hats off Ranveer! https://t.co/bAH7pyBtE7
— Kapil Dev (@therealkapildev) November 11, 2019
या चित्रपटात रणवीर सिंग भारताचा कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसेल. तर, दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर, या चित्रपटात ताहिर राज बहसीन, ऍमी वर्क, हार्डी संधू आणि चिराग पाटील, इत्यादी कलाकार दिसतील.
हा सिनेमा पुढच्या वर्षी 10 एप्रिल, 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.
मॅक्सवेल पाठोपाठ हा खेळाडूही मानसिक आजाराने त्रस्त, पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास दिला नकार
वाचा👉https://t.co/7PVN8WhM54👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019
दिल्ली कॅपिटल्सच्या संघात फील्डिंग कोच मोहम्मद कैफने या खेळाडूचे केले खास स्वागत!
वाचा👉https://t.co/ELa2JJIVTj👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019