---Advertisement---

विनोद कांबळीच्या मदतीला आले वर्ल्ड कप विजेते स्टार, परंतु ही एक अट मान्य करावी लागेल!

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 2:40 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि दिग्गज सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच तो प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती कार्यक्रमात दिसला होता, जिथे तेंडुलकरनं त्याची भेट घेतली. यावेळी कांबळी याची प्रकृती खालावल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. सचिनला भेटत असताना त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. आता कांबळीची ही अवस्था पाहून 1983 च्या विश्वचषक विजेत्या स्टार्सनं त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कार्यक्रमाच्या काही दिवसांनंतर कांबळीचा बालपणीचा मित्र आणि प्रथम श्रेणी पंच मार्कस कौटो यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं, “त्याला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत. त्याचा रिहाबमध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही तीन वेळा त्याला रिहाबसाठी घेऊन गेलो आहे.”

आता कांबळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 1983 विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार कपिल देव आणि गोलंदाज बलविंदर सिंग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र कांबळीला मदत करण्यापूर्वी त्याला आधी स्वत:ला मदत करावी लागेल, असं ते म्हणाले. बलविंदर सिंग म्हणाले, “कपिल देवनं मला स्पष्टपणे सांगितलं आहे की, जर त्याला रिहाबसाठी जायचं असेल तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. मात्र, त्याला आधी स्वत: रिहाब करावं लागेल. जर त्यानं तसं केलं तर उपचार कितीही काळ चालले तरी आम्ही बिल भरण्यास तयार आहोत.”

विनोद कांबळीनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यानं 54.20 च्या सरासरीनं 1084 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीनं 2477 धावा केल्या. त्यानं कसोटीत 4 शतकं आणि 3 अर्धशतकं केली. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 2 शतकं आणि अर्धशतकं ठोकली आहेत.

हेही वाचा – 

टीम इंडियासाठी दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर
अभिषेक शर्माची झंझावती खेळी; अवघ्या 28 चेंडूत ठोकले शतक, या विश्वविक्रमाशी बरोबरी
रेकाॅर्डब्रेक..! टी20 मध्ये वनडे इतकी टोटल, 20 षटकांत या संघाने ठोकल्या चक्क 349 धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---