भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार कपिल देव (Kapil Dev) निवृत्तीच्या इतक्या वर्षांनंतरही चर्चेत असतात. ते नेहमी क्रिकेटबाबत त्यांचे मत मांडताना दिसून येतात. परंतू यावेळी कपिल देव (Kapil Dev) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) असं वक्तव्य केलं आहे. ज्यानं खळबळ उडाली आहे. त्यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं.
कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, “रोहित शर्मा विराट सारखा खेळत नाही, उड्या मारत नाही. पण त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत आणि त्या मर्यादेत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अनेक मोठे खेळाडू येतात. ते फक्त स्वतःसाठी येतात. ते संघाचं नेतृत्वही स्वतःसाठी करतात. परंतू रोहित तसा नाही. तो संपूर्ण संघाला आनंदी ठेवतो.”
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतासाठी सलामी देणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट आतापर्यंत या स्पर्धेत शांत राहिली आहे. बांगलादेशविरुद्ध त्यानं केवळ 37 धावांची खेळी खेळली होती. याशिवाय संपूर्ण विश्वचषकात तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. परंतू इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारताला कोहलीकडून नक्कीच योगदानाची अपेक्षा असेल.
कपिल देवबद्दल (Kapil Dev) बोलायचं झालं तर कपिल देवनं भारताला पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. 1983 मध्ये भारतानं कपिल देवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. कपिल देवनं 225 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 434 विकेट्स घेतल्या आहेत. त्यासोबतच त्यानं 3783 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वाेत्कृष्ट धावसंख्या नाबाद 175 राहिली आहे.
कपिल देवनं 131 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 434 विकेट्स घेतल्या आहेत आणि सोबतच त्यानं 5248 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 8 शतक तर 27 अर्धशतक ठोकले आहेत. कपिल देवच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 शतकं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं सावट! मॅचपूर्वी पाहा उपांत्य फेरीचे संपूर्ण गणित
‘या’ दोन रेकाॅर्डसहित दक्षिण आफ्रिकेनं मारली फायनलमध्ये धडक!
श्रीलंकेला धक्का! जयवर्धनेच्या पाठोपाठ हेड कोच ख्रिस सिल्व्हरवुडनी दिला राजीनामा