---Advertisement---

श्रीलंकेला धक्का! जयवर्धनेच्या पाठोपाठ हेड कोच ख्रिस सिल्व्हरवुडनी दिला राजीनामा

On: गुरूवार, जून 27, 2024 1:33 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. श्रीलंकेचा संघ साखळी सामन्यात  फक्त एकच सामना जिंकू शकला आणि सुपर-8 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. यानंतर संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यानंतर महेला जयवर्धनेने श्रीलंका संघाच्या सल्लागार प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. आता यादरम्यान श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ख्रिस सिल्व्हरवुड 2022 पासून मुख्य प्रशिक्षक होते. मात्र आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा खुद्द श्रीलंका क्रिकेट संघ मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. आपल्या राजीनाम्याबाबत सिल्व्हरवूड म्हणाला, “आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून मला माझ्या कुटुंबापासून बराच वेळ दूर जावे लागते. माझ्या कुटुंबाशी दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर, मला आता घरी परतण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची वेळ आली आहे. ”

श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) सोबत घालवलेल्या वेळेबद्दल त्यानी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनाचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो. तुमच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही यश शक्य झाले नसते.”

ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या प्रशिक्षकाच्या कारकीर्द बद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेच्या संघाने 2022 मध्ये आशिया टी-20 चषक जिंकला होता आणि 2023 मध्ये आशिया एकदिवसीय कपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. याशिवाय संघाने देश-विदेशात अनेक द्विपक्षीय मालिकाही जिंकल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील एकदिवसीय मालिका जिंकले आणि बांग्लादेशविरुद्ध दोनदा परदेशात कसोटी मालिका जिंकले.

महत्तवाच्या बातम्या-

रडारड सुरू! भारत सेमीफायनलमध्ये गेल्यामुळे वाढली इंग्लंडच्या खेळाडूची पोटदुखी, म्हणाला….
रोहितने दिलं इंझमाम-उल-हकला सडेतोड उत्तर, अर्शदीप सिंगवर केलं होतं गंभीर आरोप
“आम्ही या स्पर्धेचा…” सेमीफायनलमधील पराभवानंतर राशिद खानची प्रतिक्रिया समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---