---Advertisement---

रडारड सुरू! भारत सेमीफायनलमध्ये गेल्यामुळे वाढली इंग्लंडच्या खेळाडूची पोटदुखी, म्हणाला….

On: गुरूवार, जून 27, 2024 12:35 PM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या तिन्ही विभागात शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकली आहेत. स्पर्धेतील साखळी फेरीत कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या व्यतीरिक्त भारताने एकही सामना गमावला नाही. सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात कांगारुना हरवून भारत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता 27 जून रोजी सेमीफायनल-2 मध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध सामना रंगणार आहे. यादरम्यान इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वार्नने भारतीय संघावर टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वार्नने सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल मधील सामन्या दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर पोस्ट शेअर करत म्हणाला “हा सेमी नक्कीच गयानाचा असायला हवा होता.. पण संपूर्ण स्पर्धा भारताच्या दिशेने असल्याने इतरांवर अन्याय होत आहे”.  अर्थात टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या वेळापत्रकावर वॉनने टीका केली आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात खेळला जाणारा उपांत्य फेरीचा सामना गयाना येथे झाला पाहिजे, असे मत माजी इंग्लंडच्या कर्णधाराचे आहे. वास्तविक वॉनने याआधी आणखी एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी वेळापत्रकाबद्दल संताप व्यक्त केला.

माजी इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनचे थेट मत आहे की, जे काही वेळापत्रक बनवण्यात आले आहे, ते भारताला लाभ देण्याच्या उद्देशाने बनवण्यात आले आहे. त्याचवेळी गयाना येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच पावसामुळे अतिरिक्त वेळेनंतरही सामना होऊ शकला नाही, तर भारताला अंतिम फेरीसाठी विजेता घोषित केले जाईल.

महत्तवाच्या बातम्या-

रोहितने दिलं इंझमाम-उल-हकला सडेतोड उत्तर, अर्शदीप सिंगवर केलं होतं गंभीर आरोप
“आम्ही या स्पर्धेचा…” सेमीफायनलमधील पराभवानंतर राशिद खानची प्रतिक्रिया समोर
दक्षिण आफ्रिकेनं रचला इतिहास, अफगाणिस्तानंला पछाडून फायनलमध्ये थाटात एंट्री!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---