---Advertisement---

रोहितने दिलं इंझमाम-उल-हकला सडेतोड उत्तर, अर्शदीप सिंगवर केलं होतं गंभीर आरोप

On: गुरूवार, जून 27, 2024 11:10 AM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ आज 27 जून रोजी गयाना येथील गयाना नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसरा उपांत्य सामना खेळणार आहे. तत्तपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 11व्या सुपर-8 सामन्यात इंझमाम-उल-हकने अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सेमीफायनलपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अर्शदीप सिंगचे समर्थन करत इंझमाम उल हकला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकने दावा केला होता की सामन्यादरम्यान चेंडूशी काहीतरी छेडछाड करण्यात आली होती, ज्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाच्या डावात चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात यशस्वी झाला होता.

पाकिस्तानच्या 24 न्यूज या टीव्हीचॅनेलशी बोलताना इंझमाम म्हणाला होता, “तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करु शकत नाही की अर्शदीप सिंग जेव्हा 15 वे षटक टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. नवीन चेंडूसाठी इतक्या उशीरा रिव्हर्स स्विंग करणे शक्य का? याचा अर्थ असा की 12व्या-13व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तयार झाला होता. अर्थातच चेंडू सोबत छेडछाड झाली आहे. “जर पाकिस्तानी गोलंदाजांनी हे केले असते, तर सगळीकडे खळबळ उडाली असती.

रोहित शर्मा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवरील आरोप स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारे तयार नव्हता. रोहित शर्मा म्हणाला, “याला मी काय उत्तर देऊ? जर तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात खेळत असाल आणि विकेट कोरड्या असतील, तर चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग घेतो. चेंडू फक्त आमच्यासाठीच नाही तर सर्व संघांसाठी स्विंग होत असतो. तो पुढे म्हणाला, कधीतरी आपले मन मोकळे करणे महत्त्वाचे आहे. कारण आम्ही इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये खेळत नाही, तर वेस्ट इंडिज मध्ये स्पर्धा होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत  येथील खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स स्विंग होणे स्वाभाविक आहे. 

महत्तवाच्या बातम्या-

“आम्ही या स्पर्धेचा…” सेमीफायनलमधील पराभवानंतर राशिद खानची प्रतिक्रिया समोर
दक्षिण आफ्रिकेनं रचला इतिहास, अफगाणिस्तानंला पछाडून फायनलमध्ये थाटात एंट्री!
दक्षिण आफ्रिका समोर अफगाणिस्तानंच लोटागंण, सेमीफायनलमध्ये 56 धावांत सर्वबाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---