मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचे माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी योयो टेस्ट ही संघनिवडीसाठी एकच पात्रता नको असे भाष्य केले आहे.
खेळाडू जर फीट असेल तर त्याला संघात स्थान द्यायला हवे. मॅराडोना हे काही वेगाने धावत नव्हते परंतु जेव्हा चेंडू त्यांच्याकडे असायचा तेव्हा ते सर्वात वेगवाग फूटबाॅल खेळत असतं. असंच क्रिकेटपटूंच देखील अाहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
माजी क्रिकेटपटूंमध्ये कोण कोण ही टेस्ट पास झालं असतं?
या प्रश्नावर कपील देव यांनी काही दिग्गज खेळाडूंची नावे घेतली. “सुनिल गावसकर यांना १५ मिनीटांच्यापेक्षा जास्त धावायला आवडायचं नाही. परंतु ते ३ दिवसांपेक्षा जास्त काळ फलंदाजी करु शकत होते. अनिल कुंबळे, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण देखील योयो टेस्ट पास झाले असते किंवा फेलही झाले असते. तरीही ते चांगल्या कामगिरीमुळे महान खेळाडू ठरले आहे.” असं मतं त्यांनी व्यक्त केलं
महत्त्वाच्या बातम्या-
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात
-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य