इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम युएई येथे नुकताच पार पडला. या स्पर्धेनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या आवडत्या टी20 प्लेईंग इलेव्हनची निवड केली. दिग्गजांनी निवडलेल्या या संघात खराब फॉर्ममध्ये असलेल्या एमएस धोनीचा समावेश नव्हता. मात्र, भारतीय दिग्गजाने नुकत्याच निवडलेल्या वनडे संघात एमएस धोनीला स्थान देण्यात आले आहे.
नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कपिल देव यांची हजेरी
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या पॉडकास्ट कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यानी त्यांच्या आवडत्या प्लेईंग इलेव्हन संघाबद्दल माहिती दिली.
सचिन, सेहवाग, द्रविड यांना संघात दिले स्थान
आपल्या आवडत्या प्लेईंग इलेव्हनबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, “कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये बराच फरक आहे. जर मी वनडे संघ निवडत असेल, तर माझ्या संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, युवराज सिंग या खेळाडूंचा समावेश असेल.”
धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही- कपिल देव
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला काही खास कामगिरी करता आलेली नाही. एवढेच नव्हे, तर त्याच्या फलंदाजीनेही सर्वांनाच निराश केले. खराब कामगिरीनंतरही कपिल देव यांनी त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये धोनीला स्थान दिले आहे.
“माझ्या प्लेईंग इलेव्हन संघात फक्त एमएस धोनीच यष्टीरक्षक असेल. त्याची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. आपल्याकडे झहीर खान, जवागल श्रीनाथ यासारखे उत्तम गोलंदाज आहेत. आधुनिक काळातील युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सुद्धा प्रतिभावान गोलंदाज आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हे महान फिरकीपटू आहेत. प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी या क्रिकेटपटूंची नावे सर्वप्रथम माझ्या मनात आली,” असेही पुढे बोलताना कपिल देव म्हणाले.
https://www.instagram.com/p/CHrq6qAHjjq/?utm_source=ig_web_copy_link
कपिल देव सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक
क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची गणना होते. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 1983 साली पहिला विश्वचषक जिंकला होता.
कपिल देव यांचा प्लेईंग इलेव्हन संघ
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, युवराज सिंग, एमएस धोनी (यष्टीरक्षक), झहीर खान, जवागल श्रीनाथ, जसप्रीत बुमराह, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित आणि ईशांत मुकण्याची शक्यता
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”