भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात अलिकडेच 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भविष्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. दरम्यान आता माजी महान भारतीय अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी दोन दिग्गजांच्या भविष्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीने (Virat Kohli) 9 डावात फलंदाजी करताना 1 शतकासह केवळ 190 धावा केल्या. दरम्यान तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर वारंवार झेलबाद झाला. कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) कामगिरी देखील वाईट होती, त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात फक्त 31 धावा केल्या. खराब फॉर्ममुळे तो पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला.
माजी महान भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांना जेव्हा विराट-रोहितच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “विराट आणि रोहित हे खूप मोठे खेळाडू आहेत आणि त्यांना खेळातील त्यांचे भविष्य स्वतः ठरवू द्या.” रोहितचे संघात स्थान दावेदारांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “यात कोणताही वाद होऊ नये. सध्याच्या कर्णधारानेही दुसऱ्याची जागा घेतली आहे. त्याला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे”
या दौऱ्यावर भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही फ्लाॅप ठरली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वगळता इतर कोणताही गोलंदाज धारदार गोलंदाजी करू शकला नाही. दुखापतीमुळे बुमराह पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला हे छोटे लक्ष्य गाठणे अधिक सोपे झाले. या दौऱ्यात बुमराहने सुमारे 150 षटके गोलंदाजी करत 32 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल मेगा लिलावानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनसोल्ड ठरला ‘हा’ स्टार खेळाडू
दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूसोबत गैतवर्तन, फ्लाईटही चुकली; इंस्टा स्टोरी द्वारे संताप व्यक्त
तेम्बा बवुमा कर्णधार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ!