सध्या भारतीय खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत आहेत. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे टी20 विश्वचषकातून बाहेर पडले असून, आणखी काही खेळाडूंना दुखापतीने सतावले आहे. त्याचवेळी अनेक खेळाडू आपल्यावर प्रचंड मानसिक व शारीरिक दबाव असल्याचे देखील बोलत असतात. या संपूर्ण प्रकारावर आता भारताचे विश्वविजय कर्णधार व दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी सरळ शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कपिल देव यांना भारतीय खेळाडूंविषयी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले,
“आजकाल अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दबाव असल्याचे म्हणताना दिसतात. त्यांच्यावर असाच दबाव असेल तर मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी आयपीएल खेळूच नये.”
ते पुढे बोलताना म्हणाले,
“खेळाडू याबाबत सारखेच बोलत असतात. प्रेशर, डिप्रेशन हे अमेरिकन शब्द मला आवडत नाहीत. तुम्हाला खेळाबद्दल आवड असेल, तुम्ही खेळाचा आनंद घेत असाल तर तुम्ही अशा शंका उपस्थित करत नाहीत. खेळाचा आनंद घेण्यासाठी कोणताही दबाव नसतो.”
भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये दोन महिन्याच्या कालावधीत कमीत कमी 14 सामने खेळतात. यादरम्यान अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात. स्पर्धेतील सामने अत्यंत अटीतटीचे होत असल्याने, खेळाडूंवर अतिरिक्त दबाव देखील असतो. काहीवेळा खेळाडूंनी देखील याबाबत कबुली दिली आहे.
सध्या भारतीय खेळाडू मोठ्या संख्येने दुखापतग्रस होताना दिसत आहेत. बुमराह व जडेजा या प्रमुख खेळाडूंसह शमी आणि दीपक चहर हे खेळाडू देखील सध्या आपल्या तंदुरुस्तीशी झुंजताना दिसत आहेत. तसेच अर्शदीप सिंग व दीपक हुडा हेदेखील काही काळ दुखापतग्रस्त होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज
बाबरकडून टीकाकारांची बोलती बंद, न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकत विराट-रोहितच्या विक्रमाशी केली बरोबरी
सिराजच्या वेगापुढे डी कॉकने टेकले गुडघे, पापणी लवण्याच्या आतच उडवल्या दांड्या; व्हिडिओ पाहाच