---Advertisement---

हार्दिकच्या कसोटी पुनरागमनावर विश्वविजेत्या कर्णधाराची प्रतिक्रिया, म्हणाला…

On: बुधवार, ऑगस्ट 16, 2023 7:41 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. या मालिकेत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशात आता भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी त्याच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार असला तरी हार्दिक कसोटी क्रिकेट खेळत नाही. मार्च महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेवेळी तसेच आयपीएल वेळी त्याने कसोटी संघात पुनरागमन करण्याचा इरादा नसल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावर बोलताना नुकतेच कपिल देव यांनी भाष्य केले. ते म्हणाले,

“सध्या भारतीय क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या याचे शरीर फिट क्रिकेटपटूंपैकी एक वाटतो. त्याचे शरीर खरंच त्याला साथ देत असेल तर त्याने कसोटी क्रिकेट खेळायला हवे. मात्र, मला वाटत नाही की तो सध्या त्याबाबत काही विचार करत आहे.”

यापूर्वी भारताचे माजी अष्टपैलू रवी शास्त्री यांनी देखील हार्दिक याने कसोटी क्रिकेट खेळण्याचा विचार करावा असे म्हटले होते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर अनेकांनी हार्दिकच्या कसोटी संघातील पुनरागमनाची इच्छा व्यक्त केलेली.

हार्दिक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असला तरी, मागील जवळपास चार वर्षांपासून तो कसोटी संघाचा भाग नाही. 2018 इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हार्दिकच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केल्यास, 11 कसोटीत त्याने 32 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याबरोबर त्याच्या नावे 17 बळी देखील जमा आहेत.

महत्वाच्या बातम्या –
योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण बॅडमिंटन स्पर्धेत आठ खेळाडूंना विजेतेपद
अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---