भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. कपिल देव भारतीय संघाच्या खेळाडूंवर सतत गंभीर प्रश्न उपस्थित करत असतात. आता त्यांनी भारतचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी बुमराहला काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कपिल देव यांच्या मते 2023 विश्वचषकापर्यंत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumraha) जर बरा झाला नाही, तर भारतीय संघाने त्याच्यावर घालवलेला वेळ वाया जाईल. माध्यमांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कपिल देव (Kapil Dev) म्हणाले की, “बुमराहला काय झाले आहे? त्याने खूप आत्मविश्वासाने काम करायला सुरुवात केली. पण तो विश्वचषकापर्यंत फिट होऊ शकला नाही, तर संघाने त्याच्यावर वेळ वाया घालवला, असे म्हणावे लागेल.”
रिषभ पंत देखील दुखापतीमुळे मागच्या जानेवारी 2023 पासून संघातून बाहेर आहे. कपिल देव पंतविषयी म्हणाले की, “जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला अँतिम सामन्यात पराभाव स्विकारावा लागला. त्या सामन्यात ऋषभ पंत (Rishab Pant) सारखा खेळाडू असता तर आपण तो सामना आपण जिंकलो असतो.”
“मला देखील खूप वेळा दुखापत झाली आहे. पण आपण स्वताची काळजी घेतली पाहीजे. आयपीएल ही खूप मोठी स्पर्धा आहे, पण आयपीएलमुळे तुमचं नुकसान देखील होऊ शकत. खेलाडूंना किरकोळ दुखापत असेल तरी तुम्ही आयपीएल खेळू शकता. पण किरकोळ दुखापतीमध्ये भारतासाठी खेळता येत नाही. त्यावेली तुम्हाला विश्रांतीची गरज असते,” असे कपिल देव पुढे म्हणाले. भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या मते बीसीसीआयने देखील खेळाडूंच्या वेळापत्रकावर लक्ष दिले पाहिजे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली होती, तर नुकताच एक सराव सामना देखील खेळला. या सामन्यात बुमराहने 10 षटके गोलंदाजी केली असून आगामी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने ही संघासाठी चांगली बाब आहे. बुमराह संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
ASHES 2023 । ब्रॉडबाबत बोलताना अँडरसनला भावना अनावर, डोळ्यातून पाणी आल्याचा VIDEO व्हायरल
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बुमराहने मिळवली फिटनेस, सराव सामन्यात केली 10 षटके गोलंदाजी