मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी जयपूरमध्ये लिलाव पार पडला. या लिलाव सोहळ्यासाठी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि सुनील गावसकर उपस्थित होते.
या सोहळ्यानंतर गावसकरांना विचारण्यात आले की कपिल देव जर यावेळी लिलावात असते तर त्यांच्यावर किती रकमेची बोली लागली असती.
यावर गावसकर यांनी कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध केलेली 175 धावांची खेळी आठवण करुन देताना जर ते यावेळी आयपीएल लिलावात असते तर त्यांना 25 कोटीच्या आसपास बोली लागली असते असे म्हटले आहे.
गावसकर याबद्दल आजतकशी बोलताना म्हणाले, ‘ती 175 धावांची खेळी मी खेळाडू आणि समालोचक म्हणून पाहिलेली वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी होती. मी त्यापेक्षा चांगली खेळी पाहिलेली नाही.’
‘आम्ही त्यावेळी 5 बाद 17 धावा अशा परिस्थितीत होतो. त्यावेळी वातावरण थंड आणि चेंडू वळत होता. तेव्हा असे वाटत होते की आम्ही 70 किंवा 80 धावांतच सर्वबाद होऊ. पण कपिल यांनी कोणतेही मोह घालणारे शॉट न मारता 80 धावा केल्या होत्या. त्यांचे षटकार पाहणे रोमांचकारी होते. त्यामुळे जर ते आज आयपीएल लिलावात असते तर त्यांना 25 कोटी ही किंमत मिळाली असती.’
आयपीएलमध्ये नेहमीच अष्टपैलू खेळाडूंना संघ अधिक पसंती देताना दिसतात. 2017 आणि 2018 या दोन्ही आयपीएल लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तसेच 2015 मध्ये भारताचा अष्टपैलू युवराज सिंगलाही सर्वाधिक किंमत मिळाली होती.
तसेच यावर्षी वरुण चक्रवर्थी या तमिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूलाही सर्वाधिक किंमत मिळाली आहे. त्याला 8 कोटी 40 लाखात किंग्ज इलेव्हन पंजाबने संघात सामील करुन घेतले आहे. त्याच्या बरोबरच जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजावरही राजस्थान रॉयल्स संघाने 8 कोटी 40 लाखांची बोली लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–…तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीची होणार सुट्टी
–अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल
–२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली
–एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…