---Advertisement---

महाराष्ट्र पराभवाच्या छायेत, कर्नाटकच्या मयांक अग्रवालचे त्रिशतक

---Advertisement---

गहुंजे, पुणे । येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यात महाराष्ट्रावर डावाने पराभवाची नामुष्की ओढवली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील २४५ धावांना प्रतित्तोर देताना कर्नाटकने दुसरा आज ५ बाद ६२८वर घोषित केला.

त्यांनतर फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने दिवसाखेर ३७ षटकांत ४ बाद १३५ धावा केल्या आहेत. सलामीवीर स्वप्नील गुगळे(०) आणि हर्षद खडीवाले (१९) यांना विशेष चमक दाखवता आली नाही. भरवशाचा फलंदाज अंकित बावणे (१७)आणि नौशाद शेख (३) स्वस्तात बाद झाले. 

प्रतिभावान खेळाडू ऋतुराज गायकवाडने मात्र राहुल त्रिपाठीबरोबर चांगली भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिला. ऋतुराज ६१ तर त्रिपाठी ३३ धावांवर खेळत आहे. 

महाराष्ट्राला डावाने पराभव टाळण्यासाठी अजूनही २४८ धावांची गरज आहे. सामन्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. 

तत्पूर्वी कर्नाटकचा सलामीवीर मयांक अग्रवालने ४९४ चेंडूत नाबाद ३०४ धावा करताना खणखणीत त्रिशतक केले. भारतीय क्रिकेटच्या प्रथम श्रेणी प्रकारातील ही ५०वी त्रिशतकी खेळी असून कर्नाटकडून केवळ करून नायर आणि केएल राहुल यांनी यापूर्वी त्रिशतकी खेळी केली आहे. त्याचे शतक झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने लगेच डाव घोषित केला.

कालच्या २ बाद ४६१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केलेल्या कर्नाटकच्या केवळ दोन विकेट्स घेण्यात महाराष्ट्राला यश मिळाले. आज करुण नायर जो काल ५६ धावांवर खेळत होता त्यानेही आज शतकी खेळी केली.

महाराष्ट्राकडून चिराग खुराणाने ३९ षटकांत १४७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. 

संक्षिप्त धावफलक:

महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद- २४५

कर्नाटक पहिला डाव: ५ बाद ६२८

आर समर्थ- १२९, मयांक अग्रवाल- ३०४*, करून नायर-११६, चिराग खुराणा- ३/१४७

महाराष्ट्र दुसरा डाव: ४ बाद १३५

ऋतुराज गायकवाड खेळत आहे ६१, राहुल त्रिपाठी खेळत आहे ३३

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment