युरोपमधील अनेक दिग्गज फुटबॉलपटूंचा सौदी अरेबियामध्ये फुटबॉल खेळण्याकडे कल वाढू लागलाय. ख्रिस्टीयानो रोनाल्डोनंतर आता फ्रान्सच्या करीम बेंझेमा याने रियाल माद्रिदची साथ सोडली असून, सौदी अरेबियामध्ये फुटबॉल खेळण्यास प्राधान्य दिले आहे. त्याने मंगळवारी (6 जून) सौदी प्रो लीगमधील अल इतिहात संघाशी करार केला.
फ्रान्सचा माजी कर्णधार राहिलेला बेंझेमा याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतली होती. मागील 14 वर्षांपासून तो स्पेनमधील रियाल माद्रिद संघाचा भाग होता. रियाल बालबियो विरुद्धच्या आपल्या अखेरच्या सामन्यात गोल करत त्याने रियालला अलविदा केला. बेंझेमा सध्या बेलॉन डि ऑर हा फुटबॉल विश्वातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.
सौदी प्रो लीगमधील अल इतिहात संघाने त्याच्याशी करार केला. याच संघाने मागील वर्षी स्पर्धेचा हंगाम जिंकला होता. हा करार 2026 पर्यंत असेल. दरवर्षी त्याला या संघासाठी खेळण्यासाठी भारतीय रुपयांमध्ये तब्बल 1765 कोटी रुपये मिळणार आहेत. बेंझेमा याचा सौदी प्रो लीगमध्ये एकेकाळी रियाल माद्रिदचा सहकारी असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्याशी थेट सामना होईल. रोनाल्डो मागील वर्षीपासून या लीगमध्ये अल नासेर संघासाठी खेळताना दिसत आहे.
(Karim Benzema Singed With Saudi Pro League Team Al Ittihad Leave Real Madrid After 14 Years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
केएस भरतचा मोठा खुलासा, WTC फायनलसाठी धोनीकडून IPL मध्येच घेतल्या आहेत टिप्स