नुकतीच आयपीएल २०२१ स्पर्धा संपन्न झाली आहे. यूएईमध्ये झालेल्या या स्पर्धेनंतर सर्व खेळाडू मायदेशात परतले आहेत. आता येत्या काही दिवसात देशांतर्गत क्रिकेटमधील मोठी स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली असून, दरम्यान या स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची घोषणा करण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मनीष पांडेला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर मयंक अगरवाल आणि देवदत्त पडिक्कल या संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसून येतील. संघातील वरिष्ठ खेळाडू केएल राहुल सध्या राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात व्यस्त आहे. तो सध्या यूएईमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
तसेच या हंगामासाठी मनीष पांडेचे संघात पुनरागमन झाले आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेतून त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. मनीष पांडेच्या अनुपस्थितीत करून नायरने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती. २०२०-२१ हंगामात संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या पवन देशपांडेला या संघात स्थान देण्यात आले नाहीये. तर अभिमन्यु मिथुनने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात निवृत्ती जाहीर केली आहे. कर्नाटक संघाने २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
कर्नाटक संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक
१) कर्नाटक विरुद्ध मुंबई – ४ नोव्हेंबर
२)कर्नाटक विरुद्ध छत्तीसगड – ५ नोव्हेंबर
३)कर्नाटक विरुद्ध सर्व्हिसेस – ६ नोव्हेंबर
४)कर्नाटक विरुद्ध बडोदा – ८ नोव्हेंबर
५)कर्नाटक विरुद्ध बंगाल – ९ नोव्हेंबर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी असा आहे कर्नाटकचा संघ
मनीष पांडे (कर्णधार), मयंक अगरवाल, देवदत्त पडिक्कल, केवी सिद्धार्थ, रोहन कदम, अनिरुद्ध जोशी, अभिनव मनोहर, करुण नायर, शरत बीआर, निहाल उलाल, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गौतम, जगदीश सुचित, प्रवीण दुबे, केसी करियप्पा, प्रसिद्ध कृष्णा, प्रतीक जैन, यश्क विजयकुमार, एमबी दर्शन, विद्याधर पाटिल.






