कर्नाटक क्रिकेट संघाने २०१४-१५मध्ये रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. आता ११ वर्षांनंतर कर्नाटक अंतिम फेरीत पोहोचला होता. त्याचबरोबर देवदत्त पड्डीकलच्या नेतृत्वात कर्नाटकची एका दशकाची प्रतिक्षा संपली. दुसरीकडे जम्मू आणि काश्मिर पहिल्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अंतिम सामना २४ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटककडून केएल राहुलने चांगली फलंदाजी केली. त्याने उपांत्य पूर्व फेरीचा फॉर्म कायम राखत पहिल्या डावात १४१ धावा आणि दुसऱ्या डावात ८६ धावा केल्या. त्याने संपूर्ण सामन्यात एकूण २२७ धावा केल्या. तसेच पड्डीकलने २३२ धावा केल्या. तो दुसऱ्या डावात फलंदाजीला आला नाही.
उत्तराखंडही पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यामुळे त्यांचे पहिल्यांदा अंतिम फेरी खेळण्याचे स्वप्न तुटले. या सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना ७३६ धावांचा डोंगर उभा केला. त्याबदल्याच उत्तराखंडचा पहिला डाव २३३ धावसंख्येवरच संपुष्टात आला.
कर्नाटकने दुसऱ्या डावात ३२३ धावा केल्या आणि उत्तराखंडला ८२७ धावसंख्येचे लक्ष्य दिले. उत्तराखंडने ६ विकेट्स गमावत २६० धावांवर पराभव पत्करला. हा सामना अनिर्णीत राहिला. नियमानुसार कर्नाटकने पहिल्या डावात आघाडी घेतल्याने त्यांना विजेते घोषित केले गेले. यावेळी कर्नाटकच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजांनीही कमाल केली. तसेच पड्डीकल या सामन्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला.
राहुलसाठी हा हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. त्याने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यातही शतकी खेळी केली होती. त्याने मुंबईविरुद्धच्या त्या सामन्यात १३० धावा केल्या होत्या. त्यानंतर आता उपांत्य सामन्यातील कामगिरी.
जम्मू-काश्मिरही पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी उपांत्य फेरीत बंगालचा पराभव केला. यामुळे अंतिम सामन्यात आकिब नबीची गोलंदाजी विरुद्ध कर्नाटकची फलंदाजी असा सामना पाहायला मिळेल.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मुंबईने (४२) जिंकली आहेत. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो. त्यांनी ८ विजेतेपद पटकावली आहेत.






