भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. नियोजित वेळापत्रकानुसार, 17 ते 21 डिसेंबरदरम्यान ऍडलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल. या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर ‘भारत अ’ आणि ‘ऑस्ट्रेलिया अ’ या दोन संघात तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. यादरम्यान एक धडकी भरवणारे दृश्य पाहायला मिळाले.
कार्तिक त्यागीच्या चेंडूवर पुकोव्हस्की जखमी
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या 13 व्या षटकांत भारतीय युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी गोलंदाजी करायला आला. त्याने षटकातील दुसराच चेंडू वेगवान बाउंसर टाकला. फलंदाजी करत असलेला ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू विल पुकोवस्कीने मिड विकेटवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला.
मैदानात काही काळ चिंतेचं वातावरण
डोक्याला चेंडू लागल्यामुळे पुकोवस्की अस्वस्थ अवस्थेत लगेच खाली बसला. ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ त्याची तपासणी करण्याकरिता लगेच मैदानात आले. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
Fingers crossed for Will Pucovksi, who's retired hurt after this nasty blow to the helmet.
Live scores from #AUSAvIND: https://t.co/MfBZAvzAkr pic.twitter.com/pzEBTfipF2
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
विल पुकोवस्की रिटायर्ड हर्ट
त्यानंतर विल पुकोवस्की रिटायर्ड हर्ट झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये परत गेला. भारताने पहिला डाव 247 धावांवर केला घोषित
भारतीय संघाने पहिला डाव 247 धावांवर घोषित केला होता. यात अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे (नाबाद 117) आणि चेतेश्वर पुजारा (54) यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाने पहिल्या 59 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज ‘फ्लॉप’
भारताला दुसऱ्या डावात काही खास कामगिरी करता आली नाही. एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून खेळण्यात यश आले नाही. भारताने दुसरा डाव 9 बाद 189 धावांवर घोषित केला.
सामना झाला अनिर्णित
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलिया संघाची 2 बाद 52 अशी स्थिती होती. मात्र, तीन दिवसांचा कालावधी संपल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?