---Advertisement---

आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक

---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू करुण नायरला भलेही आयपीएलमध्ये संधी मिळाली नसेल, मात्र तो इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना नायरनं नाबाद 202 धावा केल्या.

केरळच्या करुण नायरनं 253 चेंडूत 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 202 धावा करत ग्लॅमॉर्गनच्या गोलंदाजांची तारांबळ उडवून दिली. नॉर्थम्प्टनशायरकडून रिकार्डो वास्कोसेलास (182) आणि सैफ जायब (100) यांनीही शतकी खेळी खेळल्या.

ग्लॅमॉर्गनच्या पहिल्या डावाच्या 271 धावांच्या प्रत्युत्तरात, नॉर्थम्प्टनशायरनं आपला पहिला डाव 145.4 षटकात 605/6 धावांवर घोषित केला. अशाप्रकारे नॉर्थम्प्टनशायरनं पहिल्या डावात 334 धावांची मोठी आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा नॉर्थम्प्टनशायरनं 40 षटकांत 104 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. ग्लॅमॉरगनला सध्या डावानं पराभवाचा धोका आहे.

व्हिटॅलिटी काउंटी चॅम्पियनशिपनं करुण नायरच्या द्विशतकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. दोन मिनिटं आणि एक सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये करुण नायर अनेक आकर्षक फटके खेळताना आणि आपलं पहिलं द्विशतक पूर्ण करताना दिसतोय.

 

कौंटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा करुण नायर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी हा पराक्रम केला होता. अझहरनं कौंटी क्रिकेटमध्ये दोनदा द्विशतक झळकावलं आहे. डर्बीशायरकडून खेळताना त्यानं लीसेस्टरशायरविरुद्ध आणि नंतर डरहमविरुद्ध 1994 मध्ये द्विशतक झळकावलं होतं. त्याच वेळी, चेतेश्वर पुजारा हा कौंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावणारा भारतीय फलंदाज आहे. पुजारानं कौंटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत.

टीम इंडियाकडून खेळताना करुण नायरच्या नावे कसोटीमध्ये त्रिशतक आहे. त्यानं 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत 303 धावा ठोकल्या होत्या. दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर भारतासाठी त्रिशतक झळकवणारा तो तेव्हा दुसराच खेळाडू होता. मात्र या कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघात नियमित संधी मिळाली नाही. त्यानं 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ना फलंदाजीत, ना गोलंदाजीत, त्याचा संघात काहीच उपयोग नाही”; सेहवागनं घेतला सॅम करनचा क्लास

“मी छाती ठोकून सांगतो तो नॉट आऊट आहे”, विराट कोहलीच्या वादग्रस्त विकेटवर नवज्योत सिंग सिद्धूची प्रतिक्रिया

राहुल तेवतिया पुन्हा एकदा ठरला हिरो! गुजरातचा पंजाबवर 3 गडी राखून विजय, गुणतालिकेत घेतली मोठी झेप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---